Guru Uday 2023: ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडतो. एकूण २७ नक्षत्र आहेत, त्यापैकी एक पुष्य नक्षत्र आहे, या नक्षत्रावर गुरू आणि शनीचा प्रभाव आहे. हे नक्षत्र ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानलं जातं. ज्योतिषी सांगतात की, जेव्हा पुष्य नक्षत्र रविवारी किंवा गुरुवारी येतं तेव्हा हा अत्यंत दुर्मिळ योगायोग मानला जातो. हा दुर्मिळ योगायोग यावेळी २७ जुलै रोजी गुरु उदयासहच जुळून येत आहे. २२ एप्रिलला १२ वर्षातील सर्वात मोठे गुरु गोचर झाले आहे, त्यापाठोपाठ आता २७ एप्रिलला गुरूचा उदय होणार आहे व याच दिवशी गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे. यामुळे नेमक्या कोणत्या राशीला धनलाभ होण्याची संधी आहे हे पाहूया…
गुरुपुष्यामृत योग तिथी
गुरुपुष्यामृत योग तिथी प्रारंभ: २७ एप्रिल सकाळी ७ वाजल्यापासून सुरु
गुरुपुष्यामृत योग तिथी समाप्ती: २८ एप्रिलला सकाळी ५ वाजून ४३ मिनिटांपर्यंत
गुरुपुष्यामृत योग बनून ‘या’ राशी होणार कोट्याधीश?
मेष रास (Mesh Rashi)
मेष राशीच्या गोचर कुंडलीत गुरूचा उदय प्रथम स्थानी होत आहे. यामुळे तुम्हाला कुंडलीत भाग्याची साथ लाभू शकते. मेष राशीला विशेषतः प्रवासाचे योग दिसत आहेत. घरात एखादा मंगल प्रसंग अचानक येऊ शकतो. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करत असलेल्यांना लवकरच गोड बातमी मिळण्याची चिन्हे आहेत. तसेच प्रेमाला घरच्यांची मदत होण्याची चिन्हे आहेत. तुमच्या आयुष्यात सकारत्मक बदल घडून आल्याने कामात लक्ष द्यायला वेळ मिळू शकतो ज्यामुळे तुम्हाला प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Tula Rashi)
गुरु उदय तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीत कर्मस्थानी उदय होत आहेत. या प्रभावाने तुम्हाला गुरुरुपी वाडवडिलांचा आशीर्वाद लाभू शकतो. याकाळात तुम्हाला पूर्वजांच्या संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. याकाळात समाजात मान- सन्मान मिळून त्यासह जोडून एखादी मोठी जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागू शकतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी ही वेळ उत्तम ठरणार आहे. महिलांसाठी प्रेम अनुभवण्याची संधी मिळू शकणार आहे. याकाळात आर्थिक दृष्टीने अनुकूल वेळ सुरु असणार आहे.
हे ही वाचा<< १२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग ‘या’ राशींना बनवणार गडगंज श्रीमंत? गुरुदेव देऊ शकतात लाखोंचा धनलाभ
धनु रास (Dhanu Rashi)
गुरूचा उदय पंचम स्थानी होणार असल्याने धनु रास समृद्धी अनुभवू शकते. गुरु उदय विद्यार्थी अवस्थेतील धनु राशीच्या लोकांसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतो. गुरु उदय होताच सरकारी नोकरी करणाऱ्या मंडळींना मोठ्या लाभाचे संकेत आहेत. व्यापारी वर्गासाठी हा काळ शुभ सिद्ध होऊ शकतो. जर आपण कुठे गुंतवणूक करू इच्छित असाल तर लाभाची चिन्हे आहेतच पण काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. कुटुंबासह प्रवासाचे योग आहेत.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)