Guru Pushya Yog 2024: ज्योतिषशास्त्रानुसार गुरू पुष्य योग हा तेव्हा निर्माण होतो जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र असतो. हिंदू धर्मानुसार हा दिवस अत्यंत खास मानला जातो कारण गुरुवार हा देव गुरूचा दिवस असतो जो ज्ञान, धन आणि यशाचे देवता मानले जाते. पुष्य नक्षत्र हा अत्यंत शुभ नक्षत्रांपैकी एक असतो.
पंचांग नुसार वर्ष २०२४ चा शेवटचा गुरू पुष्य योग आज म्हणजेच २१ नोव्हेंबरला पडत आहे. या योगचा परिणाम काही राशींवर दिसून येईल. नवीन वर्षाच्या पूर्वी या राशींचे नशीब चमकू शकते. जाणून घेऊ या त्या कोणत्या राशी आहेत, ज्यांना फायदा मिळू शकतो.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरू पुष्य योग अत्यंत शुभ ठरणार आहे. या दिवशी या लोकांची काम करण्याची क्षमता वाढेन आणि हे लोक योग्य संधीचे सोने करतील. घर कुटुंबात सुख शांती लाभेल आणि मंगलकार्यात हे लोक सहभागी होतील. तसेच या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरूवात आपल्यासाठी फायद्याची ठरू शकते.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग अडकलेल्या कामे पूर्ण करण्यात मदत करणारा ठरेन. या लोकांना नोकरी आणि परिक्षेत यश मिळू शकते. या दरम्यान आई वडिल आणि जवळच्या लोकांचे सहकार्य लाभेन ज्यामुळे आत्मविश्वास वाढेन.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी गुरू पुष्य योग आनंद आणि यश घेऊन येणारा असेल. या लोकांच्या घरात आणि कामामध्ये चांगले बदल दिसून येईल. काही लोकांचा पगार वाढू शकतो आणि गुंतवणूकीतून मोठा फायदा होऊ शकतो. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेन. सामाजिक स्तरावर या लोकांची ओळख निर्माण होणार.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी हा योग मेहनतीचा डबल फायदा देणारा असेन. कामामध्ये या राशीचे लोक जितके सक्रिय असेल, तितका जास्त या लोकांना फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ व्यवसाय वाढवणारा आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना मनाप्रमाणे नोकरी मिळू शकते. या दरम्यान केलेला प्रवास फायद्याचा ठरू शकतो.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत खास असणार आहे. दीर्घ काळापासून जे काम अपूर्ण आहेत, ते पूर्ण होतील. या लोकांचे व्यवाय आणि काम करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा दिसून येईल ज्यामुळे तुमच्या सहकाऱ्यांवर आणि वरिष्ठांवर प्रभाव पडेल. अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. या दरम्यान या लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळू शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)