Diwali 2024 Guru Pushya Nakshatra : दिव्यांचा सण अर्थात दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले असून त्याची तयारी बाजारपेठेत दिसून येत आहे. लोकांनीही खरेदीची तयारी सुरू केली आहे. याची सुरुवात नवरात्रीपासूनच झाली होती, पण सर्वात मोठा आणि शुभ मुहूर्त २४ ऑक्टोबरला येणार आहे. कारण या दिवशी गुरु पुष्य योग असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैदिक ज्योतिष आणि वैदिक पंचांगमध्ये एक उत्कृष्ट योग आहे. येथे दिवसाचे स्वामित्व वेगवेगळ्या ग्रहांना दिले जाते. त्यामुळे या विशेष दिनी ग्रहांनुसार, नक्षत्र आणि राशीचे अनेक योग-संयोग तयार होतात. ऑक्टोबर २४ तारखेला गुरु पुष्य योग होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, गुरुवारचा दिवस जेव्हा गुरु पुष्य नक्षत्रात येते तेव्हा गुरुपुष्य योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुपुष्य योगामध्ये असे कार्य केले जाते, यश आवश्यक असते. मान्यता आहे की, या योगादरम्यान केलेले सर्व कार्य शुभ मानले जातात.

गुरु पुष्य योगामध्ये दागिने, जमीन, घर आणि वाहनांपासून ते इलेक्ट्रिकल वस्तूंपर्यंत सर्व काही खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र, याशिवाय दिवाळीपूर्वी आणखी अनेक शुभ मुहूर्त येणार आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

शुभ वेळ

या ऑक्टोबर महिन्यात दिवाळीपूर्वी १५ ऑक्टोबरला सर्वार्थ सिद्धी आणि सूर्ययोग तयार होत आहे. १६ ऑक्टोबर रोजी रवि योग तयार होईल. तसेच 17 आणि १८ ऑक्टोबरला सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार असून २१ ऑक्टोबरला सर्वार्थ सिद्धी योगासह अमृत सिद्धी योग तयार होणार आहे. २२ ऑक्टोबरला त्रिपुष्कर योग तयार होईल आणि २४ ऑक्टोबरला सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी तयार होतील. या दिवशी सर्वात मोठा शुभ मुहूर्त म्हणजेच गुरु पुष्य योग तयार होत आहे. यानंतर २९ ऑक्टोबरला त्रिपुष्कर योग आणि ३० ऑक्टोबरला सर्वार्थ सिद्धी योग व्यतिरिक्त २ नोव्हेंबरला त्रिपुष्कर योग तयार होईल.

पुष्य नक्षत्र कधी पर्यंत

पुष्य नक्षत्र सुरू होते: २४ ऑक्टोबर २०२४, गुरुवारी सकाळी ११:४५ पासून
पुष्य नक्षत्र संपेल:२५ ऑक्टोबर २०२४, शुक्रवारी दुपारी १२:३१ च्या सुमारास

हेही वाचा –कोजागिरी पोर्णिमेला चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब! चांगले दिवस येणार

पुष्य नक्षत्राचे महत्त्व

ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते, जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरु पुष्य नक्षत्र म्हणतात. असे मानले जाते की, या नक्षत्रात जेव्हा तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करता तेव्हा ती तुमच्यासाठी शुभ असते आणि तुम्हाला आशीर्वाद देते. तसेच तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येतेॉ

हेही वाचा –कोजागिरी पोर्णिमेनंतर सुर्य देव बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा आणि पद-प्रतिष्ठा

या गोष्टी तुम्ही पुष्य नक्षत्रात खरेदी करू शकता

घर, प्लॉट, फ्लॅट, शेतजमीन आणि व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्याव्यतिरिक्त दिवाळीपूर्वी सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनमचे दागिने खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही दुचाकी-चारचाकी आणि टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, लॅपटॉप इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru pushya yoga is getting ready before diwali know the auspicious time to buy jewelry property vehicle snk