-उदयराज साने
BJP Astrology Prediction: २०२३ हे वर्ष महत्त्वपूर्ण ग्रह गोचरांचे वर्ष आहे, वर्षाच्या सुरुवातीलाच शनीने तब्बल ३० वर्षांनी स्वराशीत म्हणजेच कुंभ मध्ये प्रवेश घेतला होता. तर आता २२ एप्रिलला गुरु ग्रह १२ वर्षांनी मेष राशीत आला आहे. याचा प्रभाव येत्या काळातील निवडणुकांवर सुद्धा होणार असा अंदाज ज्योतिषतज्ज्ञ उदयराज साने यांनी वर्तवला आहे. फलज्योतिषाच्या माध्यमातून तज्ज्ञ उदयराज साने यांनी यापूर्वीच सांगितले होते की, शनि भ्रमण कुंभ राशीतूनच होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या राशीच्या चतुर्थातून हे शनी भ्रमण होणार आहे. यामुळेच २१ एप्रिल नंतरच्या सर्व निवडणुकात पंतप्रधान मोदींना विजयासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीतच पंतप्रधानांना काही निर्णयात फेरबदल करावे लागणार आहेत, असाही अंदाज वर्तवण्यात आला होता.
मुस्लीम समाज देशासाठी…
२०२४ च्या निवडणुका नेटकेपणाने पार पडण्यासाठी मुस्लिम समाजाचं सहकार्य मिळवावं लागणार असल्याचं दिसून आल्यानेच, जानेवारी २०२३ मध्ये पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांच्या सभेत मुस्लिम समाजाला तोडू नका, तर जोडा असा नारा देण्यात आला.
आता एप्रिल-मे २०२४ असे निवडणुकीचे महत्त्वाचे हे दोन महिने असल्याने, गुरू-हर्षल पक्षाला अत्यंत उपयुक्त असले तरी संमिश्र फळ देणारे आहेत. या अगोदर होणारा गुरू-राहू युती योग राष्ट्रप्रेमी जनतेसाठी सकारात्मक ऊर्जा देणार असून, मुस्लीम समाज देशासाठी चांगला विचार व योगदान देऊ शकतो. या समाजाला तसे करण्यास भाग पाडण्यासाठी पक्षाला जास्त मेहनत करावी लागणार आहे.
हे ही वाचा<< “२०२४ मे नंतर निवडणूक झाली तर भाजपाला फक्त… ” ज्योतिषतज्ज्ञांनी कुंडलीवरून केली मोठी भविष्यवाणी
भाजपाच्या मूळ कुंडलीतील चंद्राला हा मेष-गुरू सहावा राहणार असल्याने, हा गुरू संमिश्र फळ देईल. शनीचे सध्या सुरू असलेले कुंभ राशीतील भ्रमण पक्षात अनेक स्वरूपाचे नवे बदल घडविण्यास भाग पाडणार आहे. कोणाच्याही कष्टाला किंमत मिळवून देण्याचे काम हा गोचर शनी करणार आहे. शततारका नक्षत्रातून भ्रमण करणाऱा शनी मकर व कुंभ नवमांशातून जाणार असल्याने, कष्टकरी जनतेला निश्चितपणे न्याय मिळवून देणार आहे.