Guru-Shukra’s parivartan Rajyoga: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेकदा दोन ग्रहांची एकाच राशीत युतीदेखील निर्माण होते. ज्यामुळे काही शुभ योग किंवा राजयोग निर्माण होतात. सध्या गुरू शुक्राच्या वृषभ राशीत विराजमान असून शुक्र गुरूच्या मीन राशीत विराजमान आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या राशीमध्ये विराजमान असून यामुळे परिवर्तन योग निर्माण झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन मित्र ग्रह किंवा शत्रू ग्रह एकमेकांच्या राशीत विराजमान असतात तेव्हा ते त्या राशीवर कोणताच अशुभ प्रभाव टाकत नाहीत, याउलट ते त्या राशीच्या व्यक्तींना शुभ आशीर्वाद प्रदान करतात.
पंचांगानुसार, २८ जानेवारी रोजी शुक्र मीन राशीत विराजमान झाला असून तो ३१ मे पर्यंत या राशीत राहिल. तसेच दुसरीकडे गुरू वृषभ राशीमध्ये विराजमान असून तो १ मे रोजी राशी परिवर्तन करेल. त्यामुळे गुरू-शुक्र परिवर्तन राजयोग १ मे पर्यंत राहिल. तोपर्यंत याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
गुरू-शुक्र देणार आनंदी आनंद
मेष
मेष राशीच्या व्यक्तींना परिवर्तन राजयोग अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. याच्या शुभ प्रभावाने तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. शुक्राचे राशी परिवर्तन मेष राशीच्या अकाराव्या घरात असेल. या काळात तुम्हाला धनलाभ होईल. आरोग्य चांगले राहिल. कुटुंबीयांसह आनंदाचे क्षण व्यत्तीत कराल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळेल. कामातील अडचणी दूर होण्यास मदत होईल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींना परिवर्तन राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. शुक्र तुमच्या सातव्या घरात विराजमान असेल. या काळात तुमचे वैवाहिक जीवन सुखमय होईल. वाहन, संपत्ती, घर खरेदी करू शकता. व्यवसाय, नोकरीत लाभ मिळेल. नोकरी येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.
मीन
मीन राशीचे राशी स्वामी देवगुरू बृहस्पती आहेत. जे कुंडलीच्या तिसऱ्या घरामध्ये वृषभ राशीत विराजमान आहेत. गुरूच्या शत्रू राशीतील प्रवेशाने मीन राशीच्या व्यक्तींना अनेक लाभ होतील. सध्या मीन राशीच्या व्यक्तींना शनीची साडेसाती सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असला तरीही या परिवर्तन राजयोगाने तुम्हाला खूप फायदा होईल. भाग्याची साथ मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. अडकलेले पैसा परत मिळतील. कराल त्या कामात यश मिळवाल. समाजात मान-सन्मान प्राप्त कराल. सरकारी नोकरीसाठी मेहनत घेत असलेल्यांना यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहिल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. पगारवाढ होईल. अविवाहितांचे लग्न ठरेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)