Guru Transit Horoscope: ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार, राशीमध्ये बदल करतो. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर फार महत्त्वाचं समजलं जातं. ग्रहांच्या राशी परिवर्तनाला गोचर म्हणतात. सुख, संपत्ती, वैभव, ऐषाराम आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या गुरूचा राशी बदल अनेकार्थांनी महत्त्वाचा ठरतो. आता शुक्रदेवाच्या वृषभ राशीत गुरुदेवाने गोचर केलं आहे. जे २०२५ पर्यंत याच राशीत विराजमान राहणार आहेत. पुढील वर्षी १४ मे रोजी गुरू बुधाच्या राशीत प्रवेश करतील. त्यामुळे गुरुदेवाच्या कृपेने येणारे २९३ दिवस काही राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. चला तर जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या…
‘या’ राशींचे चमकणार भाग्य?
वृषभ राशी
देवगुरुच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस सुख, समृध्दी घेऊन येणारे ठरु शकते. या राशीतील मंडळींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात आरोग्यविषयक समस्या दूर होऊ शकतात. तसेच करिअरमध्ये प्रगती होताना दिसून येऊ शकते. चांगल्या बातम्या मिळू शकतात. या काळात प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तसेच नोकरीत बढतीची शक्यता निर्माण होईल. जे बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. व्यवसायात सुरू असलेले अडथळे दूर होऊन धनलाभ होऊ शकतो. कर्जाचा बोजाही हलका होऊन कौटुंबिक वातावरण आनंदी राहण्याची शक्यता दिसत आहे.
(हे ही वाचा : ९ दिवसांनी ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? मंगळाच्या कृपेने हातात येऊ शकतो चांगला पैसा )
सिंह राशी
देवगुरुच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी यश मिळू शकतो. तर जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. अविवाहित लोकांचा विवाह निश्चित केला जाऊ शकतो. या राशीतील मंडळी नवीन मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करू शकतात. या दरम्यान राजकारणाशी संबंधित लोकांना काही पद मिळू शकते. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ ठरु शकतो. एकूणच माता लक्ष्मीची या राशीतील मंडळीवर कृपा असू शकते.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांना देवगुरुच्या कृपेने मोठा फायदा होऊ शकतो. यावेळी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. यासोबतच नोकरीत प्रगती होण्यासोबतच पगार वाढण्याचीही शक्यता आहे. व्यवसायातही तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. या काळात तुमचे रखडलेले काम पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगतीसह उत्पन्नात वाढ होऊ शकते. मान-सन्मान वाढू शकतो आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांति नांदण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)