Mangal- Guru Gochar 2024 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह काही ठरावीक काळाने राशिबदल करीत असतो. ग्रहांचा राशिबदल हा प्रत्येक राशीसाठी शुभ-अशुभ सिद्ध होत असतो. त्यात देवगुरू ग्रह गुरू आणि ग्रहांचा सेनापती मंगळ एकाच राशीत प्रवेश करणार आहेत. या दोन्ही ग्रहांचा एकाच राशीतील संयोग शुभ मानला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळ १२ जुलै रोजी संध्याकाळी ७.१२ वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे आणि त्याच वेळी गुरूदेखील वृषभ राशीत भ्रमण करीत आहे. अशा स्थितीत वृषभ राशीत मंगळ आणि गुरू यांचा संयोग झाल्याने काही राशीधारकांना प्रचंड फायदा होऊ शकतो. गुरू आणि मंगळाचा हा संयोग २५ ऑगस्टपर्यंत राहणार आहे. पण, मंगळ व गुरू यांच्या संयोगाने कोणत्या राशीच्या लोकांचे नशीब पालटणार ते जाणून घेऊ…

मेष

मेष राशीधारकांसाठी गुरू आणि मंगळाचा संयोग लाभदायक मानला जातो. कामाच्या ठिकाणी वातावरण छान असेल, तुम्हाला कामात तुमचे मित्र आणि बॉसचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. कामातील चिकाटी तुम्हाला नव्या पदापर्यंत जाण्याची संधी निर्माण करुन देऊ शकेल. तुम्हाला आर्थिक अडचणींपासून दिलासा मिळेल, तुमचे अडकलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतात. तुम्ही नवीन गुंतवणूक पर्यायांचा विचार करत असल्यास हा शुभ काळ आहे. परदेश प्रवास करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

मकर

मकर राशीधारकांना गुरू आणि मंगळाचा संयोग फलदायी ठरू शकतो. नोकरी करणारे लोक कौतुकास पात्र असतील. तुमच्या कामाचे ऑफिसमध्ये कौतुक होऊ शकते. मित्रपरिवाराचा पाठिंबा मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. नव-नव्या ऑफर्स तुम्हाला मिळू शकतात. काम करत असताना किरकोळ समस्याही उदभवू शकतात; पण त्या जोडीदाराच्या सहकार्याने सहज सोडविता येतील. तुम्ही जितके निर्भय राहाल, तितके यश तुमच्या पायांशी लोळण घेईल. तुम्हाला प्रत्येक कामात जोडीदाराची उत्तम साथ मिळू शकते. यामुळे तुमचे वैवाहिक जीवनही सुखात जाऊ शकते.

कुंभ

कुंभ राशीधारकांसाठी गुरू आणि मंगळाचा संयोग शुभ मानला जातो. मंगळ आणि गुरूच्या शुभ प्रभावामुळे तुमची कित्येक दिवस किंवा महिन्यांपासून रखडलेली सर्व प्रलंबित कामे सुरू होऊ शकतील. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा काळ शुभ मानला जातो. तसेच नव्या आर्थिक गुंतवणुकीसाठीही देखील हा काळ योग्य आहे. तुम्हाला सुख आणि संपत्तीचा लाभ मिळू शकतो. नोकरी व्यवसायात सर्वकाही सुरळीत चालू राहू शकते. त्याच वेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru transit mars horoscope jupiter mangal rashi parivartan together will create stir 3 zodiac sign will become a rich sjr