Guru Nakshatra Parivartan 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुला देवतांचे गुरू मानले जाते. ते बुद्धी, ज्ञान, विवेक, यश आणि सन्मानाचे प्रतिक आहे. इतर ग्रहांप्रमाणे बृहस्पती सुद्धा राशी मध्ये बदल करतात जेव्हा ते गोचर करतात. जेव्हा ते गोचर करतात तेव्हा तेव्हा त्याचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर पडतो. गुरू काही महिन्यानी एक सुखद संयोग निर्माण करणार आहे.
१० एप्रिल २०२५ ला मृग शिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर ते १४ जून ला आद्रा नक्षत्रात पोहचणार. ३ महिन्याच्या आत दोनदा गुरू नक्षत्र परिवर्तन करत असल्याने काही राशींचे नशीब बदलू शकते. ते अपार धन प्राप्त करतील. ते समाजात खूप यश आणि सन्मान कमावतील. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
कर्क राशी (Cancer Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी गुरूचे दोन वेळा नक्षत्र परिवर्तन करणे फायदेशीर ठरू शकते. या गोचर मुळे या लोकांच्या इच्छा पूर्ण होतील. जर कोणी गाडी किंवा प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत असेल तर इच्छा पूर्ण होईल. पीएफ किंवा कोणत्याही जुन्या गुंतवणूकीतून अचानक चांगला नफा मिळू शकतो. रियल सेक्टरमध्ये व्यवसायात नफा दुप्पट होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी लोक कौतुक करतील.
मेष राशी (Aries Zodiac)
गुरू गोचर पासून या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम होणार आहे. या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन स्त्रोत निर्माण होतील ज्यामुळे पैशांच्या बाबतीत हे लोक मजबूत होतील. हे लोक दागिने किंवा प्लॉट खरेदी करण्यात पैशांची गुंतवणूक करू शकतात. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर त्यांना चांगली संधी मिळतील. त्यांना चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरीची संधी मिळू शकते. पत्नीबरोबर या लोकांची ट्युनिंग वाढणार. हे लोक वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकतील. कुटुंबाबरोबर हे लोक आनंदाने बाहेर फिरायला जाऊ शकतात.
वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)
देव गुरू बृहस्पती दोन वेळा नक्षत्र परिवर्तन करणार आहे. हे नक्षत्र परिवर्तन या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते. या लोकांना कर्जापासून मुक्ती मिळू शकते. समाजात या लोकांना भरपूर यश मिळेल. या लोकांना समाजात पुरस्कार प्राप्त होतील. काही लोक स्वत:चा बिझिनेस सुरू करू शकतात. हे लोक नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल. जुन्या मित्रांबरोबर अचानक भेट होईल. धन संपत्तीच्या प्रकरणात या लोकांना फायदा होईल.