Guru Uday 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, देवांचा गुरु बृहस्पती जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या ज्ञान, बुद्धिमत्ता, शिक्षण, संतती, परोपकार, पिता-पुत्राचे नाते, सुख-समृद्धीवर दिसून येतो. २२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी बृहस्पती मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहेत. तर २७ तारखेला गुरु मेष राशीत उदय करणार आहे. गुरूचा उदय होताच शुभ कार्याला सुरुवात होईल. दुसरीकडे, ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुच्या उदयामुळे अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद येऊ शकतो. तर त्या भाग्यवान राशी कोणकोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
‘या’ राशींना गुरू उदयामुळे लाभ –
मेष राशी –
ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या पहिल्या घरात गुरुचा उदय होत आहे. या राशीमध्ये बृहस्पती नवव्या स्थानाचे स्वामी आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. गुरूच्या उदयामुळे तुम्ही करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकता. तर नोकरदार वर्गाला प्रमोशन मिळू शकते. व्यवसायातही भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळू शकतो.
मिथुन राशी –
या राशीच्या अकराव्या स्थानी गुरु उदय होणार आहे. ज्याला इच्छा आणि समाधानाचे स्थान मानले जाते. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. तर नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी गुरूचा उदय शुभ ठरु शकतो, यासोबतच आर्थिक स्थितीही चांगली राहण्याची शक्यता आहे.
कर्क राशी –
हेही वाचा- लक्ष्मी देवी १० मे पासून ‘या’ राशींना बनवणार गडगंज श्रीमंत? मंगळ देऊ शकतो तुमच्या नशिबाला कलाटणी
या राशीच्या दहाव्या स्थानी गुरुचा उदय होत आहे. त्यामुळे तुम्हाला करिअर, पद आणि प्रतिष्ठा यामध्ये खूप फायदा होऊ शकतो, नवीन नोकरीचा शोध पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर कष्ट करणाऱ्यांच्या प्रयत्नांना यश मिळू शकते. व्यवसायात लाभ होऊ शकतो.
सिंह राशी –
या राशीच्या लोकांसाठी गुरूचा उदय लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या नवव्या स्थानी गुरुचा उदय होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना व्यवसायात लाभा होऊ शकतो पण यावेळी त्यांना काही अडचणींचाही सामना करावा लागू शकतो.
धनु –
या राशीमध्ये गुरु पाचव्या भावात उगवत आहे. हे घर बुद्धिमत्तेचे आणि मुलांचे मानले जाते. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीतच लाभ मिळू शकतो. बरेच दिवस थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. व्यवसायात थोडीशी अडचण येऊ शकते, परंतु वेळेनुसार सर्व काही ठीक होऊ शकते.
मीन –
या राशीच्या दुसऱ्या स्थानी गुरुचा उदय होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती खूप मजबूत राहू शकते. यासह उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. व्यवसायातही नफा होऊ शकतो शिवाय तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)