Guru Uday 2023 : हिंदू धर्मामध्ये कोणत्याही मंगलकार्याची सुरुवात करण्यासाठी शुभ मुहूर्त, ग्रह-नक्षत्रांची स्थिती पाहणे अत्यंत गरजेचे असते, ज्यामुळे भविष्य आनंदमयी होईल. अशा स्थितीत विवाहकाळात चातुर्मास, खरमासपासून गुरू आणि शुक्र यांचे विशेष महत्त्व असते. शुक्र किंवा गुरू अस्तंगत (मावळल्यास) झाल्यास मंगलदायी आणि शुभकार्यांवर बंधने येतात. आज- २७ एप्रिलला गुरुवारी सकाळी २ वाजून ०७ मिनिटांनी मेष राशीत गुरूचा प्रवेश झाला आहे. त्यासोबतच पुन्हा एकदा मंगलकार्ये सुरू केली जातील. १४ एप्रिलला सूर्य मेष राशीत येताच खरमास समाप्त झाला होता, त्याच वेळी मंगलकार्यांना सुरुवात होणार होती, पण गुरू अस्तंगत झाल्यामुळे असे घडू शकले नाही. गुरूच्या उदयानंतर विवाह आणि गृहप्रवेशाच्या शूभ मुहूर्तांबाबत जाणून घेऊ या.
या वर्षी गुरूचा उदय होणे खास का आहे?
हिंदू पंचांगानुसार, २७ एप्रिलला सकाळी गुरूचा मेष राशीमध्ये प्रवेश झाला आहे. त्याचबरोबर या दिवशी अत्यंत शुभ योगदेखील आहे. या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून पुष्य नक्षत्राचा योग आला आहे. गुरू-पुष्य नक्षत्रयोग सर्व योगांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. यासोबतच या दिवशी अमृतसिद्धी योग आणि सर्वार्थसिद्धी योगही असणार आहे. अशात शुभ आणि मंगलकार्ये केल्यामुळे अधिक लाभ होऊ शकतो.
हेही वाचा : ३१ मे पर्यंत चार ग्रहांच्या मोठ्या उलाढाली, ‘या’ राशी होणार लखपती? ‘या’ मार्गे मिळू शकते नशीबाला कलाटणी
विवाह मुहूर्त २०२३
मे २०२३ मध्ये येणारे विवाहासाठी शुभ मुहूर्त –
६, ८, ९, १०, ११, १५, १६, २०,२१, २२,२७, २९ आणि ३०.
जून २०२३ मध्ये येणारे विवाहासाठी शुभ मुहूर्त –
१, ३, ५, ६, ७, ११, १२, २४, २६ आणि २७
मे २०२३ मध्ये येणारे गृह प्रवेशासाठी शुभ मुहूर्त –
६, ११, १५, २०,२२, २९ आणि ३१
जून २०२३ मध्ये येणारे गृह प्रवेशाचे शुभ मुहूर्त –
या महिन्यात फक्त ११ जूनला गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त आहे.
हेही वाचा : आजपासून ‘या’ ४ राशींचे नशीब पालटणार? गुरु उदय होताच मिळू शकतो प्रचंड पैसा
जून २०२३ पासून चातुर्मास सुरू होत आहे
या चार महिन्यांत, म्हणजे चातुर्मासात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य वर्ज्य आहे, कारण या काळात भगवान विष्णू क्षीरसागरात निद्रा घेतात आणि सृष्टीच्या संचाराचे कार्य भगवान शिवाला देतात. या वर्षी चातुर्मास २९ जून २०२३ पासून सुरू होत आहे, जो २३ नोव्हेंबर २०२३ रोजी संपेल.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)