वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीसाठी राशींमध्ये गोचर किंवा बदल करतो. या दरम्यान, ग्रहांच्या राशींमध्ये उदय किंवा अस्त होत राहतो. अशातच आज २७ एप्रिल रोजी पहाटे २ वाजून ७ मिनिटांनी देवांचा गुरु बृहस्पतिचा मेष राशीत उदय होणार आहे. गुरु उदयाचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडणार आहे. या राशींपैकी कोणत्या राशींवर गुरु उदयाचा शुभ प्रभाव पडणार आहे जाणून घेऊया.
मेष –
देव गुरु बृहस्पतीचा उदय मेष राशीच्या लोकांसाठी चांगला ठरु शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. या लोकांचे पद वाढण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांचे प्रमोशन होण्याचीही शक्यता आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला लांबचा प्रवास घडू शकतो. या काळात धार्मिक आणि अध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल वाढू शकतो.
मिथुन –
मिथुन राशीच्या लोकांसाठीही गुरु उदय शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात मिथुन राशीच्या लोकांना पदोन्नतीचीही शक्यता निर्माण होत आहे. शिवाय या काळात तुमची मोठी उद्दिष्टे सहज साध्य होऊ शकतात. यासोबतच कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढू शकतो. तुमचे उत्पन्नही वाढण्यासह नवीन नोकरीच्या ऑफर मिळण्याचीही शक्यता आहे.
सिंह –
हेही वाचा- माता लक्ष्मी ६ दिवसात ‘या’ राशींना देईल अपार धनलाभ? मंगळ- शुक्र युती रातोरात बनवू शकते कोट्याधीश
सिंह राशीच्या लोकांसाठी गुरूचा उदय खूप फायदेशीर ठरु शकतो. या काळात तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच तुमचे नोकरीमध्ये प्रमोशन होऊ शकते. शिवाय अडकलेले पैसे परत मिळू शकतात तर सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांनाही या काळात यश मिळू शकते.
कुंभ –
कुंभ राशीच्या लोकांसाठीही गुरु उदय लाभ घेऊन येत आहे. या राशीच्या लोकांचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. शिवाय धनलाभ होण्याचीही दाट शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)