Guru Uday 2024: वैदिक ज्योतिष गणनेनुसार, नऊ ग्रहांमध्ये देवांचा गुरू मानला जाणारा गुरू ग्रह हा सर्वात विशेष मानला जातो. देवगुरु बृहस्पती हे संतान, जीवनसाथी, धन, संपत्ती, मार्गदर्शक, प्रशासक, शिक्षण, ज्योतिष, धर्म, उच्च पद इत्यादींचा कारक मानले गेले आहेत. गुरु हा नेहमीच लाभदायक ग्रह मानला जातो. जेव्हा एखाद्या ग्रहाची राशी बदलते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि सतत बदलणाऱ्या जगावर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुचा उदय जूनमध्ये होणार आहे. देवगुरुचा जून महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत उदय होणार आहे. ३ जून २०२४ रोजी दुपारी ३:२१ वाजता वृषभ राशीत गुरूचा उदय होईल. गुरूचा उदय होताच काही राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडून येऊन शकतात. याचा नेमक्या कोणत्या राशींना फायदा होईल, जाणून घेऊया…
गुरुच्या उदयामुळे ‘या’ राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू?
कन्या राशी
गुरुच्या उदयामुळे कन्या राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होऊ शकतात. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. नवीन कामाची सुरुवात फायदेशीर ठरु शकते. तुमचे बिघडलेले काम या काळात पूर्ण होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो. या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकते. समाजात मान-प्रतिष्ठेच्या मागणीत वाढ होऊ शकते. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही देश-विदेशात पर्यटनासाठी जाऊ शकता.
(हे ही वाचा : ४२ दिवस ‘या’ राशींच्या उत्पन्नात होईल प्रचंड वाढ? मंगळदेव मजबूत योग घडवून आणताच होऊ शकतात गडगंज श्रीमंत)
वृश्चिक राशी
गुरुच्या उदयामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. यावेळी तुमच्यासाठी वाहन आणि मालमत्ता देखील खरेदी करण्याचे योग निर्माण होत आहेत. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे चांगल्या ऑफर येऊ शकतात. या लोकांना अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुम्हाला व्यवसायात चांगला परतावाही मिळू शकतो. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून सर्व प्रकारची मदत मिळू शकते. तसंच समाजात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते.
मकर राशी
गुरुची उदय स्थिती मकर राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. बेरोजगारांना नवीन रोजगार मिळू शकतो. शेअर मार्केटमध्ये नफा होऊ शकतो. तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. व्यवसायात मोठे यश आणि आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही तुमचं बँक बॅलन्स वाढवण्यात यशस्वी होऊ शकता. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)