Guru Uday 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पती गुरुदेवांनी यंदा १२ वर्षांनी मेष राशीत प्रवेश घेतला आहे. यामुळे काही राशींसाठी येत्या काळात अनेक शुभ प्रभावी बदल आयुष्यात घडून येण्याची शक्यता आहे. अशातच आता गुरूच्या गोचरासह महाधन राजयोग सुद्धा तयार होत आहे. विशेष म्हणजे पुढील १८ महिने हा राजयोग कायम असणार आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार तब्ब्ल ५० वर्षांनी असा दीर्घकाळ टिकणारा व गुरूच्या प्रभावाने तयार झालेला राजयोग जुळून आला आहे. येत्या १८ महिन्यात नक्की कोणत्या राशींना उत्तम आरोग्य व धनलाभ अनुभवता येऊ शकतो हे पाहूया…
गुरु गोचरासह महाधन राजयोग, ‘या’ राशी होतील करोडपती?
मेष रास (Mesh Rashi)
मेष राशीच्या लोकांसाठी गुरुदेवाचा उदय अनुकूल ठरू शकतो. कारण गुरुदेव महाधन राजयोग तयार करून तुमच्या गोचर कुंडलीत बसले आहेत. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना यावेळी सन्मान मिळू शकतो. त्याचवेळी याकाळात तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकते.दुसरीकडे, ज्यांचा व्यवसाय तेल, पेट्रोलियम, लोह आणि खनिजांशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला असेल. तसंच हे लोकं अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Karka Rashi)
गुरुदेवाचा उदय कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण गुरुदेव तुमच्या राशीतून दहाव्या स्थानात उदय होतील. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी काम आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो. तसंच याकाळात कार्यालयातील वरिष्ठांशी संबंध सुधारू शकतात. दुसरीकडे, जे बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच जे व्यावसायिक आहेत ते या काळात व्यवसाय वाढवू शकतात.
हे ही वाचा<< १३९ दिवस शनीदेव ‘या’ राशींना देणार अचानक धनलाभ; ‘या; व्यक्तींच्या रूपात होऊ शकता कोट्याधीश
धनु रास (Dhanu Rashi)
महाधन राजयोग धनु राशीसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होऊ शकतो. गुरुदेवाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण गुरु तुमच्या गोचर कुंडलीत सप्तम स्थानावर महाधन राजयोग बनवत आहेत. त्यामुळे यावेळी तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तसेच पार्टनरशीपच्या कामात देखील फायदा होऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असेल. यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याने कोणतेही काम कराल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्या नात्यात बळ येईल असा शुभ काळ आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)