Mahadhan Rajyog In Kundali: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु बृहस्पती हा सर्वात मोठा व परिणामी प्रभावी ग्रह मानला जातो. यंदा गुरुदेवांचे सर्वात मोठे गोचर मेष राशीत झाले आहे. गुरूच्या राशीपरिवर्तनाला साधारण १८ महिन्यांचा कालावधी लागतो. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार गुरुदेव मेष राशीत उदित झाले आहेत ज्यामुळे जानेवारी २०२४ पर्यंत महाधन राजयोगाचा प्रभाव कायम राहणार आहे. हा अत्यंत शुभ योग मानला जातो आणि त्याच्या प्रभावाने येत्या काळात तीन राशींना भाग्योदयासह लखपती होण्याचे संकेत आहे. या तिन्ही राशींच्या कुंडलीत पुढील १८ महिने गुरूचा महाधन राजयोग कायम असणार आहे. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होण्याची चिन्हे आहेत हे पाहूया…

‘महाधन राजयोग’ २०२४ पर्यंत ‘या’ राशींना बनवणार लखपती?

वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)

महाधन राजयोग वृषभ राशीसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. तुम्हाला धन व लोकप्रियता लाभू शकते. तुमच्या वाणीने इतरांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या काही सवयी इतरांसाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतात त्यामुळे तुमच्याविषयी अनेकांच्या मनात मान- सन्मान वाढू शकतो. भौतिक सुख प्राप्तीसाठी अत्यंत लाभदायक काळ आहे.

Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख
Shukra Rahu Yuti Brings Wealth and Prosperity to These 3 Zodiac Signs
Shukra Rahu Yuti 2025 : राहु-शुक्रची होणार युती, या राशींचे नशीब फळफळणार; मिळणार बक्कळ पैसा

सिंह रास (Leo Zodiac Horoscope)

महाधन राजयोग सिंह राशीचे भाग्य उजळण्याची संधी घेऊन आला आहे. येत्या कालावधीत तुमच्या व्यक्तिमत्वाला एका अत्यंत आकर्षक झळाळी प्राप्त होऊ शकते. तुमचा आत्मविश्वास वाढून मन स्थिर राहू शकते. घरात सुख- समृद्धी- धन- धान्य यांची कमतरता भासणार नाही कारण तुम्ही तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावर अनेक मोठी यशाची शिखरे पार करू शकणार आहात. समाजात तुमचे नाव आदराने घेतले जाईल अशी काहीशी कामगिरी तुमच्याकडून होण्याची चिन्हे आहेत. गुंतवणुकीवर भर द्या.

मकर रास (Capricorn Zodiac Horoscope)

महाधन राजयोग मकर राशीच्या नशिबाला आवश्यक असा एक बूस्ट देऊ शकतो. तुम्हाला करिअरमध्ये मोठी झेप घेता येऊ शकते. तुमच्या दृढनिश्चयाने तुम्हाला कठीण वाटणारी कामे सुद्धा सहज पूर्ण होऊ शकतात. तुमचा बँक बॅलन्स वाढल्याने आर्थिक बाजू बळकट होऊ शकते. पैशाची चणचण नसल्याने तुम्हाला भावनिक व मानसिक स्थैर्यासाठु काम करण्यासाठी वेळ मिळू शकेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader