Guru Vakri 2023 : ज्योतिषशास्त्रामध्ये गुरू ग्रहाला खूप महत्त्व आहे. गुरूचे स्थान सर्वोच्च मानले जाते. गुरू हा सुख-समृद्धी देणारा ग्रह आहे. कुंडलीत जर गुरू शुभ असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडतात. १२ वर्षांनंतर गुरू मीन राशीमध्ये आहे आणि आता उलट चाल चालणार आहे.
गुरूची ४ सप्टेंबरपासून वक्री चाल सुरू होईल. गुरूची मीन राशीमधील वक्री चाल सर्व राशींच्या लोकांवर परिणाम करू शकते. तीन राशींना गुरूच्या वक्री चालीमुळे सर्वाधिक फायदा होऊ शकतो. त्या तीन राशी कोणत्या? जाणून घेऊ या.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांना गुरूच्या वक्री चालीचा फायदा होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यापासून या राशींना शुभ फळ मिळण्याचे संकेत आहेत. त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो आणि प्रत्येक कामात यश मिळू शकते. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. या काळात आयुष्यात सुख-समृद्धी लाभेल आणि त्यांचा बँक बॅलेन्स वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : रस्त्यावर पडलेले पैसे उचलावे की नाही? असे पैसे सापडणे शुभ की अशुभ; जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय सांगते…

मिथुन राशी

गुरूच्या उलट चालीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना आर्थिक फायदा होऊ शकतो. या लोकांच्या कमाईत वाढ होण्याची चांगली संधी आहे. त्यांना प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट मिळू शकते. त्यांना मनाप्रमाणे चांगला जोडीदार मिळू शकतो. या काळात वैवाहिक आयुष्यात आनंद राहील आणि कुटुंबाचे सहकार्य लाभेल.

हेही वाचा : Chanakya Niti : जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट कोणती? याचे महत्त्व समजून घेणारा कधीच आयुष्यात अयशस्वी होत नाही; वाचा, चाणक्य काय सांगतात?

कर्क राशी

कर्क राशीसाठी गुरूची वक्री चाल अधिक फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा कमवण्याची संधी आहे. या लोकांच्या आर्थिक समस्या दूर होणार असल्यामुळे त्यांचा मानसिक तणाव कमी होऊ शकतो.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader