Guru Vakri: ज्योतिषशास्त्रात धन-संपत्ती आणि ज्ञानाचा कारक ग्रह असलेल्या गुरू ग्रहाला खूप शुभ मानले जाते. कुंडलीत गुरू ग्रह शुभ स्थितीत असल्यास व्यक्तीला आयुष्यात या सर्व गोष्टी प्राप्त होतात. गुरू ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन होते, ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. सध्या गुरू शुक्र ग्रहाच्या वृषभ राशीत असून तो २०२५ च्या मे महिन्यात मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरु राशी परिवर्तनासह आपली चालदेखील बदलतो. सध्या गुरु मार्गी झाला आहे, परंतु तो ऑक्टोबरमध्ये गुरुची वक्री चाल सुरू करेल.

गुरू वक्री कधी होईल?

गुरू ९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजून ०१ मिनिटांपासून वृषभ राशीमध्ये वक्री होणार असून ४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दुपारी ०१ वाजून ४६ मिनिटांपर्यंत वक्री असेल. गुरुची ही वक्री चाल काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Malavya Rajyog
शुक्र निर्माण करणार मालव्य राजयोग! २०२५ मध्ये ‘या’ राशींचे नशीब पलटणार, करिअरमध्ये यशासह मिळणार अपार धन
shani vakri 2024 saturn retrograde
शनिदेव ३० वर्षांनंतर मीन राशीत होणार वक्री, २०२५ पासून उजळणार ‘या’ राशींचे भाग्य; मिळेल भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

गुरूची वक्री चाल (Guru Vakri)

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गुरूची वक्री चाल भाग्यकारक ठरेल. या काळात तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींना गुरू ग्रहाची वक्री चाल खूप अनुकूल ठरेल. या काळात धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल, भौतिक सुखात वाढ होईल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. समाजात मानसन्मान वाढेल.

हेही वाचा: ३१ जुलैपासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या सिंह राशीतील प्रवेशाने निर्माण होणार शुभ योग, ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार

धनु

गुरू ग्रहाच्या वक्री चालीमुळे धनु राशीच्या व्यक्तींना अनेक फायदे होतील. या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. नवीन संधी प्राप्त होईल. आरोग्य चांगले राहील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)