Jupiter In Mrigshira Nakshatra: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. पुढच्या महिन्यात २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी गुरू ग्रह नक्षत्र परिवर्तन करील. सध्या गुरू रोहिणी नक्षत्रामध्ये उपस्थित असून तो मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करील. गुरू ग्रहाच्या मृगशिरा नक्षत्रातील प्रवेशाने काही राशीच्या व्यक्तींवर त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरू ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन (Jupiter In Mrigshira Nakshatra)

मेष

गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी गुरू ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, भौतिक सुख-सुविधा प्राप्त कराल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल.

हेही वाचा: येणारे ३१ दिवस बक्कळ पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद

मकर

गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने मकर राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, या काळात मकर राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru will enter mrigashira nakshatra these three zodiac signs will get a lot of money and respect sap