Guru Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरु बृहस्पतींना नवग्रहातील महत्वपूर्ण ग्रहांपैकी एक मानले जाते. देवगुरुंच्या राशीपरिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर त्याचा अधिक परिणाम पाहायला मिळतो. गुरु ग्रहाने १ मे २०२४ रोजी दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश केला असून १४ मे २०२५ पर्यंत गुरु या राशीत असेल. या वर्षभरात गुरु अस्त, उदय आणि वक्रीदेखील होईल. गुरुचा वृषभ राशीतील प्रवेश काही राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक परिणाम देणारा ठरेल.

मेष

shani nakshatra gochar 2024
पुढचे १८१ दिवस शनी देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Budh gochar 2024 Libra will bring joy and happiness
आकस्मिक धनलाभ होणार; तूळ राशीतील प्रवेशाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
Saturn transit in rahu nakshatra
शनी देणार बक्कळ पैसा; राहूच्या नक्षत्रात प्रवेश करताच ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार मानसन्मान, पैसा अन् प्रेम
Surya and ketu nakshatra gochar end of September combination
सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मिळणार बक्कळ पैसा; १११ वर्षांनंतर सूर्य-केतूचा दुर्लभ संयोग, ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे चमकवणार भाग्य
Surya-Ketu yuti these three zodic sign
सूर्य-केतूची युती देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
Guru gochar 2024 these two zodiac signs will get a new job
आता पैसाच पैसा; आठ दिवसांनंतर गुरू ग्रहाच्या प्रभावाने ‘या’ दोन राशींच्या व्यक्तींना मिळणार नवी नोकरी अन् मानसन्मान
Shukra Gochar 2024 malavya yog
१० दिवसांनंतर मिळणार नुसता पैसा; ‘मालव्य राजयोग’ देणार ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रतिष्ठा

मेष राशीच्या लोकांसाठी गुरुचे वृषभ राशीतील हे राशीपरिवर्तन संपूर्ण वर्ष खूप खास ठरेल. या राशीचा गुरु नवव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात मेष राशीच्या व्यक्तींना भाग्याची भरपूर साथ मिळेल. या काळात बँक बॅलन्स वाढेल. या राशीच्या व्यक्तींची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. मान-सन्मान आणि आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

वृषभ

वृषभ राशीमध्ये गुरु आठव्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी गुरुचे राशीपरिवर्तन खूप शुभदायी ठरेल. या काळात तुमचे मन धार्मिक कार्यात अधिक रमेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. कुटुंबीयांकडून मदत मिळेल.

हेही वाचा: २६८ दिवस घरी नांदणार लक्ष्मी; शनीची चाल करणार ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करणार मालामाल

कर्क

कर्क राशीमध्ये गुरु सहाव्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे. या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल. शिक्षण क्षेत्रात हवे तसे यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी, व्यवसायात अनपेक्षित बदल घडून येतील. आयुष्यात समाधान प्राप्त होईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. वाणीवर नियंत्रण राहील; ज्यामुळे लोकांवर प्रभाव पडेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)