Mesh To Meen Horoscope Today : १३ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ माघ कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आणि गुरुवार आहे. प्रतिपदा तिथी आज रात्री ८ वाजून २२ मिनिटांपर्यंतराहील. तसेच आज शोभन योग जुळून येणार आहे आणि मघा नक्षत्र गुरुवारी रात्री ९ वाजून ७ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे . याशिवाय आज राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे १३ फेब्रुवारी रोजी माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा आहे. आजच दिवस गुरुप्रतिपदेचा असून पंचांगानुसार शुभ मानला जात आहे. माघ कृष्ण पक्षातील प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने “श्रीगुरुप्रतिपदा” असे संबोधले जाते. श्रीगुरुप्रतिदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. तर गुरुप्रतिपदेचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…
१३ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope Today)
मेष:- चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. नवीन ओळखी वाढतील. गप्पांच्या मैफलीत रमून जाल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी.
वृषभ:- कामात स्त्री वर्गाची मदत लाभेल. स्थावरच्या कामात लाभ होईल. जुनी येणी वसूल होतील. कलेचे योग्य मूल्यमापन केले जाईल.
मिथुन:- चैनीच्या वस्तु खरेदी कराल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. तुमच्या कलेला चांगली प्रसिद्धी मिळेल. व्यावसायिक वातावरण चांगले राहील. मनाजोगी खरेदी कराल.
कर्क:- मानसिक चंचलता जाणवेल. कल्पना शक्तीला वाव देता येईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वाचनाची आवड जोपासाल. परोपकारी दृष्टीकोन ठेवाल.
सिंह:- जुन्या कामातून लाभ संभवतो. रेस-सत्ता यांतून लाभाची शक्यता. काही कामे विनासायास पार पडतील. कामाचा आनंद घेता येईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवा.
कन्या:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. संपर्कातील लोकांचा सहवास वाढेल. भागिदारीतून चांगली कमाई होईल. कामाचे योग्य नियोजन करावे. घरगुती गोष्टींमध्ये अधिक लक्ष्य घाला.
तूळ:- हातातील अधिकाराची योग्य जाणीव ठेवा. क्वचित प्रसंगी टीका होऊ शकते. स्व-मतावर आग्रही राहाल. कानाचे त्रास संभवतात. भावंडांची बाजू जाणून घ्यावी.
वृश्चिक:- बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल. दिवस खटपटीत जाईल. लहरीपणाने वागू नका. दूर दृष्टीकोन ठेवावा लागेल. कष्टाला घाबरू नका.
धनू:- स्व-बळावर कामे हाती घ्याल. आत्मविश्वास वाढीस लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. स्वातंत्र्यप्रियता दर्शवाल.
मकर:- सामुदायिक वादात अडकू नका. गैर-समजुती मुळे त्रास संभवतो. डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी. उधार-उसनवारीचे व्यवहार सतर्कतेने करावेत. काही कामे खिळून पडू शकतात.
कुंभ:- कामाचा ताण जाणवेल. मुलांची चिंता लागून राहील. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल. मनातील प्रबळ इच्छेला महत्व द्यावे. प्रयत्नात कसूर करू नका.
मीन:- काही अनपेक्षित बदल घडू शकतात. वडीलांचे मत विरोधी वाटू शकते. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. हटवादीपणा करू नये. दर्जा टिकवण्याची धडपड कराल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
© IE Online Media Services (P) Ltd