Gurupushyamrita Yoga 2024: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनाच्या प्रभावाने काही शुभ तर काही अशुभ योग निर्माण होतात. ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राला खूप शुभ मानले जाते, त्यातच जेव्हा हे नक्षत्र गुरूवारी येते त्यादिवशी गुरूपुष्यामृत योग निर्माण होतो जो अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी दागिणे, वस्तू, वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच यादिवशी केलेल्या नव्या कामाची सुरूवातही खूप लाभदायी मानली जाते.

पंचांगानुसार, पुष्य नक्षत्र गुरूवारी, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजून ४९ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असेल. तसेच या दिवशी रवि योग दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपासून ते २२ नोव्हेंबर सकाळी ६ वाजून ५० मिनिटांपर्यंत असेल. तसेच यादिवशी अमृत सिद्धि आणि सर्वार्थ सिद्धि योगदेखील असणार आहे. हा योग सकाळी ६ वाजून ४९ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असेल.

Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
guru and shukra yuti | Gaj Lakshmi Rajyog
Gaj Lakshmi Rajyog : मिथुन राशीमध्ये १२ वर्षानंतर निर्माण होणार गजलक्ष्मी राजयोग, या तीन राशींचे नशीब चमकणार, होणार आकस्मिक धनलाभ
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
shani vakri 2024 saturn retrograde
शनिदेव ३० वर्षांनंतर मीन राशीत होणार वक्री, २०२५ पासून उजळणार ‘या’ राशींचे भाग्य; मिळेल भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Aries To Pisces 8th November Horoscope
८ नोव्हेंबर पंचांग : उत्तराषाढा नक्षत्रात रवि योगाचा शुभ संयोग! मेष, वृषभसह ‘या’ ५ राशींना मिळेल प्रत्येक कार्यात भरघोस यश; वाचा तुमचे राशिभविष्य

गुरू पुष्य योग तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर

मीन

मीन राशीच्या व्यक्तींसाठी गुरू पुष्य योग अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या काळात अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील.आर्थिक चणचण दूर होईल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींना गुरू पुष्य योगाचा चांगला परिणाम पाहायला मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील.

हेही वाचा: शनी-सूर्याच्या जबरदस्त प्रभावाने ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार अन् धनसंपत्तीत वाढ होणार

धनु

गुरू पुष्य योग धनु राशीच्या व्यक्तींना अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आई-वडीलांची साथ मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)