Hanuman Favourite Zodiac : श्री हनुमानाला कलियुगाचा जागृत देवता मानले जाते. अगदी मनापासून जो कोणी हनुमानाची पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तसेच संकटापासून दूर होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही राशी आहेत, ज्यावर हनुमानाची विशेष कृपा दिसून येते.
असं म्हणतात, या राशी हनुमानाच्या प्रिय राशी असतात. बजरंबलीच्या कृपेने हे लोक जीवनात खूप यश, धन संपत्ती कमवतात. तसेच हे लोक खूप धाडसी असतात आणि अडचणीचा सामना करण्यास घाबरत नाही उलट त्याचा सामना करतात.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांवर नेहमी हनुमानाची विशेष कृपा दिसून येते. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ ग्रहाचा संबंध थेट हनुमानाशी येतो. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम असते. हे लोक हनुमानाची विशेष पूजा आराधना करत असेल तर यांना यश नक्की मिळते आणि हे लोक संकटापासून दूर राहतात. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळते.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांवर नेहमी हनुमानाची विशेष कृपा दिसून येते. हे लोक कमी वयात भरपूर यश मिळवतात. हे लोक धन संपत्तीचे मालक असतात. मंगळवार आणि शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने या लोकांची आर्थिक अडचण दूर होते. यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत नाही. ते कोणतेही काम मनापासून करतात आणि त्यांना प्रत्येक कामात यश मिळते

वृश्चिक राशी ( Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी इष्ट देव हनुमान आहे. या लोकांवर हनुमानाची विशेष कृपा दिसून येते. या लोकांना नोकरी व्यवसाय खूप आवडतो. हनुमानाच्या कृपेने हे लोक संकटापासून दूर राहतात. हनुमानाची आराधना केल्याने या लोकांच्या सर्व इच्छा खूप लवकर पूर्ण होतात. या राशीच्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागत नाही.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनि असतो. शनि त्या लोकांना कष्ट देत नाही जे हनुमानाचे भक्त असतात. कुंभ राशीचे लोक हनुमानाच्या कृपेने कमी वयात खूप प्रगती करतात. या लोकांचे कोणतेही काम खूप सहज होते. जीवनात सुख सुविधा भरपूर मिळतात. ही रास हनुमानाची प्रिय राशीपैकी एक मानली जाते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)