Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंती म्हणजेच बजरंगबलीची जयंती चैत्र महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. या वेळी ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. हनुमान जयंती या सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. याला हनुमंत जयंती, हनुमान जन्मोत्सव, अंजनेय जयंती आणि बजरंगबली जयंती असेही म्हणतात. भगवान हनुमान हे माता अंजनी आणि केसरी यांचे पुत्र आहेत. त्यांचे वर्णन वायुपुत्र/ पवनपुत्र असेही केले जाते. या दिवशी भक्त मारुतीनंदनाची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतात. लोक मंदिरांत जातात, हनुमानाची पूजा करतात, पूजास्थळ सजवतात, नवीन कपडे घालतात आणि उपवास करतात.

हनुमान जयंती : तिथी आणि शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार, हनुमान जयंती चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला येते. द्रिक पंचांगानुसार हनुमान जयंती ६ एप्रिलला, गुरुवारी येते. पण, पौर्णिमा ५ एप्रिल रोजी सकाळी ९:१९ वाजता सुरू होईल आणि ६ एप्रिल रोजी सकाळी १०:०४ वाजता संपेल. हनुमान जयंती साजरी करण्याकरिता भक्तांनी या शुभ मुहूर्ताच्या वेळा लक्षात घ्याव्यात.

हेही वाचा : Happy Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीनिमित्त ‘या’ खास मेसेजद्वारे कुटुंबीय अन् मित्रमंडळींना द्या शुभेच्छा

Happy Hanuman Jayanti( Freepik)
हनुमान जयंती ( Freepik)

काय आहे हनुमान जयंतीचा इतिहास?

हनुमान जयंती ही भगवान रामाचे परम भक्त आणि हिंदू महाकाव्य रामायणातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक अशा भगवान हनुमान यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. भगवान हनुमानाच्या जन्माचे मूळ प्रभू रामाच्या युगासह जोडलेले आहे. द्रिक पंचांगानुसार, असे मानले जाते की, भगवान हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला (मंगळवार) सूर्योदयानंतर झाला होता. त्यांचा जन्म चित्रा नक्षत्र आणि मेष लग्नाच्या वेळी झाला.

हेही वाचा : शनीदेव २०२५ पर्यंत १२ राशींपैकी कुणाला देणार धनलाभ, कुणाला कष्ट? तुमच्या कुंडलीत लखपती होण्याचा योग आहे का?

हनुमान जयंतीचे महत्त्व

भगवान हनुमान हा महादेवाचा अवतार असून ते अष्टसिद्धी आणि नवनिधीचे दाता असल्याचे म्हटले जाते. ते शाश्वत ऊर्जा, निष्ठा आणि भक्तीचे प्रतीक मानले जातात. भगवान हनुमानाची प्रार्थना एखाद्याच्या जीवनात सुसंवाद, सामर्थ्य आणि यश आणण्यास मदत करते. हनुमान जयंतीच्या पूजेचे विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी बजरंगबली त्याचे पूजन करणार्‍या व्यक्तीला सर्व रोग आणि दोषांपासून दूर ठेवतो आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून त्याचे रक्षण करतो. जीवनातील दु:ख दूर होऊन सुख-शांती प्राप्त होते. यासोबतच शनिदेवाची अशुभ स्थिती असलेल्या लोकांनी हनुमान जयंतीचे व्रत केल्यास शनीचे दोष दूर होऊन त्रासांपासून मुक्ती मिळते असेही मानतात.

हनुमान जयंती २०२३ मंत्र :

भगवान हनुमानाचा मूळ मंत्र आहे –
१) ओम श्री हनुमते नमः.

२) अष्ट सिद्धी नव निधीके दाता अस बर दीन जानकी माता.

याव्यतिरिक्त, हनुमान चालीसा, सुंदरकांड आणि बजरंग बाण ही भगवान हनुमानाची स्तुती आणि आशीर्वाद घेण्यासाठी सर्वात लोकप्रिय स्तोत्रे आहेत.

Story img Loader