Hanuman Jayanti 2024 Date: हिंदू दिनर्शिकेनुसार, श्री रामाचे महान भक्त हनुमान जी यांचा जन्मोत्सव चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. यंदा २३ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाते. हनुमान जयंती हा सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे, याला हनुमंत जयंती, हनुमान जन्मोत्सव, अंजनेय जयंती आणि बजरंगबली जयंती असेही म्हणतात. या विशेष दिवशी देशभरात बजरंगबलीची विशेष पूजा केली जाते. यादिवशी भक्त मंदिरांत जातात, हनुमानाची पूजा करतात, पूजास्थळ सजवतात, नवीन कपडे घालतात आणि उपवास करतात. मात्र यंदा हनुमान जयंतीची योग्य तिथी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व काय आहे जाणून घेऊया.
हनुमान जयंती २०२४ तारीख आणि शुभ मुहूर्त
चैत्र मासातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीची सुरुवात – २३ एप्रिल रोजी पहाटे ३.२५ वा.
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा समाप्ती – २४ एप्रिल सकाळी ५.१८ पर्यंत
हनुमान जयंती तारीख- २३ एप्रिल २०२४
हनुमान जयंती पूजेचा शुभ मुहूर्त
पूजेचा मुहूर्त – २३ एप्रिल रोजी सकाळी ९.०३ ते १०.४१ पर्यंत असेल.
ब्रह्म मुहूर्त- २३ एप्रिल पहाटे ४.२० ते ०५.०४ पर्यंत
अभिजीत मुहूर्त- सकाळी ११.५३ ते दुपारी १२.४६ पर्यंत.
हनुमान जयंती 2024 चे महत्व
हिंदू धर्मात हनुमान जयंतीचे विशेष महत्त्व आहे. हा सण शक्ती, भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी हनुमानाची यथायोग्य पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते.
हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला होता, म्हणून या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून, सर्व कामांतून दूर राहत, स्नान करून, विधीनुसार हनुमानजींची पूजा केली जाते. यासोबतच शनिदेवाची अशुभ स्थिती असलेल्या लोकांनी हनुमान जयंतीचे व्रत, मंत्रजप केल्यास शनीचे दोष दूर होऊन त्रासांपासून मुक्ती मिळते असेही मानतात.
हनुमाना जयंती २०२४ मंत्र
भगवान हनुमानाचा मूळ मंत्र आहे –
ओम श्री हनुमते नमः. ।
२) अष्ट सिद्धी नव निधीके दाता अस बर दीन जानकी माता.