Hanuman Jayanti 2025 Date : हनुमान जयंती हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी हनुमान जन्माचा उत्सव मोठ्या जल्लोषात सर्वत्र साजरा केला जातो. श्रीरामावरील असीम भक्ती आणि त्यांच्या अफाट शक्तीसाठी ओळखले जाणारे हनुमान हे धैर्य, निस्वार्थ सेवा आणि भक्तीचे प्रतीक आहे. भारतातील आणि जगात अनेक देशात हिंदू हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. यंदा हनुमान जयंती कधी आहे, तु्म्हाला माहितीये का? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
हनुमान जयंती कधी आहे? (When is Hanuman Jayanti)
हनुमान जयंती यंदा शनिवारी १२ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. १२ एप्रिल रोजी पहाटे ०३:२१ वाजता पौर्णिमा तिथी सुरू होणार आणि १३ एप्रिल रोजी पहाटे ०५:५१ वाजता ही तिथी संपणार.
हिंदू पंचाननुसार, हनुमानाचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला होता, म्हणून अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासून सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन आणि प्रार्थना केली जाते.
परंपरा आणि विधी
हनुमान जयंतीच्या दिवशी, भक्त पहाटे उठून स्नान करतात आणि हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात. हा विधी सामान्यतः सूर्योदयापूर्वी सुरू होतो कारण हा हनुमानाच्या जन्माचा तास मानला जातो. पहाटे भक्त हनुमान चालीसा म्हणतात आणि गूळ, केळी आणि खायच्या पानाचा प्रसाद देतात. अनेक भक्त या दिवशी हनुमानाचा आशीर्वाद घेण्यासाठी दिवसभर उपवास सुद्धा करतात.
आध्यात्मिक महत्त्व
श्री हनुमान हे रामायणातील एक महत्त्वाचे पात्र आहेत आणि ब्रह्मचर्य, निष्ठा, नम्रता आणि निर्भयता यांचे प्रतीक आहेत. त्यांची पूजा केल्याने अडथळे दूर होतात, नकारात्मक उर्जेपासून संरक्षण मिळते आणि भक्तांमध्ये नवी शक्ती संचारते, असे मानले जाते.
हनुमानाचे मंत्र
भगवान हनुमानाचा मूळ मंत्र आहे – ओम श्री हनुमते नमः. ।
ॐ नमो भगवते हनुमते नमः
ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय। सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा
ओम नमो हनुमंतेश्वर रूपाय अमित विक्रमा प्रकट कार्या महा बलाय सूर्य कोटि समप्रभा
ॐ नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा
ॐ ह्रां ह्रीं ह्रं ह्रैं ह्रौं ह्रः॥ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट्॥’