Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंती हा हिंदूचा सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. हिंदू पंचाननुसार, या दिवशी म्हणजेच चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाचा जन्म झाला होता. हनुमान जयंती यंदा शनिवारी १२ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. शनिवारी, हनुमान जयंतीच्या जन्मोत्सवावर मीन राशीमध्ये पंचग्रही योग निर्माण होत आहे. मीन राशीमध्ये बुध, शुक्र, शनि, राहु आणि सूर्य एकत्र येत असल्याने बुधादित्य योग, शुक्रादित्य योग आणि लक्ष्मी नारायण योग तसेच मालव्य राजयोग सारखे अनेक राजयोग निर्माण होत आहे. हे सर्व राजयोग चार राशीच्या लोकांसाठी अधिक लाभदायक आहे. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत.

वृषभ राशी –

वृषभ राशीच्या लोकांसाठी हनुमान जयंतीचा दिवस अत्यंत शुभ असणार. या लोकांवर हनुमानाची विशेष कृपा दिसून येईल. या लोकांचे अडकलेले कामे वेगाने पूर्ण होतील. प्रत्येक क्षेत्रात या लोकांना यश मिळणार. नवी नोकरी मिळू शकते. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. नोकरी शोधणाऱ्या लोकांना रोजगार मिळू शकतो. आर्थिक स्थिती उत्तम राहीन.

मिथुन राशी –

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहीन. या लोकांचे नशीब चमकू शकते. या लोकांना भरपूर यश मिळेन. या लोकांना अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो. या लोकांचा आत्मविश्वास सुद्धा वाढेन. व्यवसायात नफा मिळू शकतो. घरात आनंद दिसून येईल. मान सन्मान वाढू शकतो.

वृश्चिक राशी –

हनुमानाच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीमध्ये प्रगती मिळू शकते. या लोकांचा पगारवाढ होऊ शकतो. विद्यार्थ्यांचा परिक्षेत चांगले गुण मिळू शकतात. व्यवसायात या लोकांच्या प्रगती दिसून येईल. घरात सुख शांती आणि सुविधा वाढणार.

कुंभ राशी –

कुंभ राशीच्या लोकांसाठी यंदाची हनुमान जयंती अत्यंत शुभ योग देणारी आणि लाभदायक ठरणार आहे. या लोकांची करिअरमध्ये प्रगती होईल. धन संपत्ती वाढणार. व्यवसायात या लोकांना भरपूर लाभ होणार. या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते.