Hanuman Jayanti : या वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी एक अद्भूत संयोग तयार होत आहे. आज २३ एप्रिलला हनुमान जयंतीच्या दिवशी ग्रहांचे सेनापती मंगळ ग्रह गोचर करणार आहे. त्याचबरोबर आज मंगळवार सुद्धा आहे. मंगळवार हा हनुमानाचा दिवस आहे आणि त्याचबरोबर मंगळ ग्रह मजबूत करण्यासाठी मंगळवार ओळखला जातो. आज हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ ग्रह राशी बदलणार आहे.

मंगळ ग्रह आतापर्यंत शनिबरोबर कुंभ राशीमध्ये विराजमान होते आता मंगळ गुरूच्या घरात म्हणजेच मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे आज एकाच दिवशी हनुमान जयंती, मंगळवार आणि मंगळ ग्रहाचे गोचर असे तीन मोठे संयोग दिसून येईल. त्याचबरोबर मीन राशीमध्ये राहू बरोबर मंगळ ग्रहाची युती तयार होत आहे. अशा परिस्थितीत कोणत्या राशींना फायदा होईल जाणून घेऊ या.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Ketu Gochar 2024
Ketu Gochar 2024 : केतु ग्रहाने केला सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार अचानक पैसाच पैसा!
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
Mangal rashi parivartan 2024
मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या लोकांना पुढील १३८ दिवस होणार आकस्मिक धनलाभ

या लोकांना होईल फायदा

मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन मेष, वृश्चिक, कर्क आणि सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ दिसून येईल. आजपासून ४० दिवस या राशींच्या लोकांवर हनुमानाची कृपा दिसून येईल. या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला हनुमानाची आराधना करणे त्यांना फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांनी व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा. लोकांशी बातचीत करावी. चांगली पुस्तके वाचावी, ज्ञानी लोकांच्या सानिध्यात जास्त वेळ घालवावा. मंगळ ग्रहाची ऊर्जा चांगल्या सकारात्मक कामात खर्च करावी. आर्थिक लाभ होऊ शकतो.

हेही वाचा : १९ मे पासून ‘या’ राशी होणार श्रीमंत? १२ वर्षांनी दोन ग्रहांच्या युतीने शुभ योग घडून येताच मिळू शकतो अपार पैसा

या राशींनी घ्यावी काळजी

मंगळ ग्रहाने मीन राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर राहु दिसून येईल. मंगळ आणि राहु्च्या युतीमुळे कन्या आणि तुळ राशीवर याचा परिणाम दिसून येईल. १ जून २०२४ पर्यंत कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जोडीदाराबरोबर चांगले संबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. लहान लहान गोष्टीवर वादविवाद करू नये. याचबरोबर तुळ राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)