Hanuman Jayanti Special Rashi Bhavishya: २३ एप्रिल म्हणजेच चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सवाची धामधूम पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसाचे विविधांगी महत्त्व आहे. हनुमान जयंतीसह आज कोल्हापुरात ज्योतिर्लिंग यात्रा आरंभणार आहे. संध्याकाळी ४ वाजून २५ मिनिटांनंतर शुभ मुहूर्त सुरु होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज पूर्ण दिवस वज्र योग असणार आहे तसेच चित्र नक्षत्र जागृत असेल. आजच सकाळी ८ वाजून ३९ मिनिटांनी मंगळाचे मीन राशीत गोचर होणार आहे. दिनविशेष सांगायचे झाल्यास आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. आज जागतिक पुस्तक दिन सुद्धा आहे. आजच्या दिवशी मारुतीराया नक्की कुणाला आशीर्वाद देणार आणि चैत्राचे चांदणे कुणाला बळ देणार हे पाहूया..

हनुमान जयंती विशेष: २३ एप्रिल पंचांग व राशी भविष्य

मेष:-पैज जिंकता येईल. कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्याल. मानसिक चंचलता जाणवेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. आपल्या मतावर ठाम राहाल.

Surya Nakshatra Gochar 2024
२९ डिसेंबरपासून मिळणार छप्परफाड पैसा! सूर्यदेवाच्या कृपेने चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Shani Nakshatra Gochar
Shani Nakshatra Gochar 2024 : दोन दिवसानंतर शनि देव करणार नक्षत्र परिवर्तन; या तीन राशींचा सुरू होणार राजयोग, अपार पैसा-संपत्ती मिळणार
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
shukra gochar 2025 | venus transit in meen
Shukra Gochar: २०२५ सुरु होताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? शुक्राच्या आशीर्वादाने होऊ शकतो प्रचंड धनलाभ
Saphala Ekadashi 2024
वर्षातील शेवटच्या एकादशीच्या दिवशी ‘या’ चार राशींना होणार मोठा धन लाभ, माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा
Daily Horoscope for Aries To Pisces
२३ डिसेंबर पंचांग: कोणाला पैशांचा फायदा तर कोणी घ्यावा धाडसाचा निर्णय? कशी होईल तुमच्या आठवड्याची सुरुवात? वाचा राशिभविष्य
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती

वृषभ:-कामातील चिकाटी सोडू नका. क्षुल्लक कारणांमुळे नाराज होवू नका. खोट्या गोष्टींचा आधार टाळावा. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. घरगुती जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.

मिथुन:-भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. तरूणांशी मैत्री कराल. ओळखीतील लोकांचा फायदा होईल. व्यावहारिक कल्पकता दाखवाल. व्यावसायिक गोष्टींचा योग्य अंदाज बांधावा.

कर्क:-फायदेशीर गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष केन्द्रित करावे लागेल. स्त्री सौख्याचा लाभ होईल.

सिंह:-काहीसे धोरणीपणे वागाल. अडचणी वर मात करता येईल. सुट्टीतील प्रवासाचे नियोजन कराल. बौद्धिक चुणूक दाखवण्यास वाव मिळेल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल.

कन्या:-धार्मिक कामात मन रमवाल. वडीलधार्‍यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मुलांचे वागणे दुराग्रही वाटू शकते. अती विचार करू नका.

तूळ:-जोडीदाराच्या स्वभावाचे कौतुक कराल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागेल. कौटुंबिक बाबी शांततेच्या मार्गाने घ्याव्यात. व्यावसायिक लाभाचा दिवस.

वृश्चिक:-भावंडांना मदत कराल. जोडीदाराचे विचार समजून घ्या. कामाच्या ठिकाणी तुमचा वाचक राहील. प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल. आरोग्यात सुधारणा होईल.

धनू:-बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. फार चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल.

मकर:-मानसिक स्थैर्य जपावे. सारासार विचार करून निर्णय घ्यावा. कोणत्याही प्रकारचा आततायीपणा बारा नव्हे. मैत्रीचे संबंध दृढ होतील. अचानक धनलाभ संभवतो.

कुंभ:-सामुदायिक गोष्टींचे भान राखा. जोडीदाराच्या प्रेमळ सौख्यात रमून जाल. भावंडांची मदत घेता येईल. योग्य परिक्षणावर भर द्या. कामातील महत्त्वाच्या बाबी जाणून घ्याव्यात.

हे ही वाचा<< १३९ दिवस शनी उलट चालत ‘या’ राशींच्या कुंडलीला देणार ३६० अंशात कलाटणी; प्रचंड श्रीमंती देणार शनैश्वर महाराज

मीन:-व्यावहारिक बुद्धिमत्ता दर्शवाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाचा पुरेपूर आनंद मिळवाल. मैत्रीचे नाते जपावे. व्यावसायिक वृद्धीचे नियोजन करावे.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader