6th September Rashi Bhavishya & Panchang : आज ६ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असणार आहे. तृतीया तिथी आज दुपारी ३ वाजून ०२ मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज रवि योग व रात्री १० वाजून १५ मिनिटांपर्यंत शुक्ल योग असेल. तसेच हस्त नक्षत्र पहाटे ९ वाजून २५ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे, त्यानंतर मात्र चित्रा नक्षत्र दिसेल ; हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते. तसेच आज अभिजित मुहूर्त पहाटे ११ वाजून ३९ मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला म्हणजेच आज ‘हरतालिकेचे व्रत’ केले जातात. विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी ‘हरतालिकेचे व्रत’ करतात. या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा-आराधना करतात. तर आजचा शुभ दिन मेष ते मीन राशींच्या आयुष्यात कोणती आनंदाची बातमी घेऊन येणार हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…

६ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :

मेष:- काम करताना डोक्यावर फार ताण घेऊ नका. खूप दिवसांपासून राहिलेले वाचन पूर्ण कराल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. कामातून समाधान मिळवाल. अनावश्यक तर्क-वितर्क करू नयेत.

वृषभ:- मुलांकडून आनंद मिळेल. जुनी येणी वसूल होतील. आपला दिवस चांगला जाईल. मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. मित्रांविषयी मनात ग्रह करून घेऊ नका.

मिथुन:- घरातील कामात व्यस्त राहाल. कामात जोडीदाराची मदत होईल. कामात काही स्वाभाविक बदल संभवतात. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. कठीण कामात चिकाटी सोडू नका.

कर्क:- विद्यार्थ्यानी मेहनतीला कमी पडू नये. नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता. आवडीचे पदार्थ चाखाल. जवळच्या प्रवासात समानाची काळजी घ्या. नातेवाईकांची गाठ पडेल.

सिंह:- स्वत:वर पूर्ण आत्मविश्वास ठेवा. दिवस चांगला जाईल. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. जुन्या मित्रांशी संपर्क साधला जाईल. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस.

कन्या:- वैचारिक भावना वाढीस लागेल. घरातील लोकांचे सल्ले उपयोगी येतील. अधिक श्रम उपसावे लागू शकतात. एखादे जबाबदारीचे काम अंगावर पडू शकते. जोडीदाराची गरज लक्षात घ्या.

तूळ:- व्यवसायात अधिकार प्राप्त होतील. दिवसाची सुरुवात संमिश्र असेल. दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात. मात्र आपण त्यातून मार्ग काढू शकाल. नातेसंबंध दृढ होतील.

वृश्चिक:- नोकरीत मनासारखे काम मिळेल. कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस. नवीन ओळख होईल. येणार्‍या काळात ओळखीचा फायदा होईल.

धनू:- आत्मविश्वासाने कामे कराल. मनात संशयाला थारा देऊ नका. तुमचे मार्गदर्शन इतरांना लाभदायक ठरेल. सासरच्या मंडळींकडून लाभाची शक्यता. मित्रांच्या मदतीने काही लाभ संभवतात.

मकर:- गुंतवणुकी संदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रलोभनाला भुलून जाऊ नका. दिवसाची सुरुवात उर्जेने होईल. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस. चर्चेतून मतभेद संपुष्टात येतील.

कुंभ:- काही खर्च अचानक येतील. अति तिखट पदार्थ टाळावेत. आरामाची इच्छा प्रबळ होईल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. अनुभवी व्यक्तींच्या भेटीचा योग.

मीन:- स्पर्धेत यश मिळवाल. जोडीदाराचा सल्ला घ्यावा. अचानक धनलाभाची शक्यता. महत्त्वाच्या गोष्टी गुप्त ठेवा. ध्यानधारणेतून मानसिक तणाव कमी होईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hartalika trutiya vishesh rashi bhavishya on 6th september ravi yog will be blessed zodic signs with love happiness money read marathi daily horoscope asp
Show comments