हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, भारतात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात वसंत ऋतुच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. यंदा हा गुढीपाडवा ९ एप्रिल २०२४ ला देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. हिंदूकालगणनेत शालिवाहन शकला महत्वाचे स्थान आहे. शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. तर उदयतिथीनुसार, नवरात्रीची सुरुवात ९ एप्रिलपासून होणार आहे. त्यामुळ यादिवशी अतिशय शुभ संयोग जुळून येत आहे. त्यामुळे शनिदेवाच्या कृपेने काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

मेष राशी

हिंदू नववर्ष मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. शनिदेवाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायातही तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतात. या राशीच्या लोकांना परदेशातही नोकरीच्या संधी मिळू शकतात. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते.

Guru Margi 2025
Guru Margi 2025 : २४ तासानंतर पालटणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे नशीब; गुरुच्या सरळ चालीने संपत्तीत वाढ, नोकरी-व्यवसायात यश
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
shani gochar positive impact
आता नुसता पैसा! शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार नवी नोकरी, वैवाहिक सुख अन् गडगंज श्रीमंती
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
Shani Gochar 2025
फेब्रुवारी महिन्यात शनि देव बदलणार चाल, ‘या’ तीन राशींचे धनी होणार! मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
seven Navpancham Yog
तब्बल ५५९ वर्षानंतर निर्माण होतोय सात नवपंचम राजयोग, ‘या’ तीन राशींची होईल चांदीच चांदी! धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
Budh Shukra Yog
बुध – शुक्राच्या योगमुळे ‘या’ तीन राशींना अपार श्रीमंतीसह लाभेल समृद्धी; नोकरी, करिअर अन् व्यवसायात फळफळणार नशीब

(हे ही वाचा: वाईट काळ संपेल! १३ एप्रिलपासून ‘या’ राशींसाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडणार? २ ग्रहांची युती होताच मिळू शकतो चांगला पैसा)

सिंह राशी

गुढीपाडव्यापासून तुम्हाला नशीबाची साथ मिळू शकते. यावेळी अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहू शकते. नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. नवीन आणि चांगल्या नोकरीच्या ऑफर येत्या काही दिवसात मिळू शकतात. व्यवसायात आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतात. मुलाशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात.

धनु राशी

हिंदू नववर्षापासून धनु राशीच्या लोकांचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. या काळात तुम्हाला आकस्मिक पैसा मिळू शकतो. या काळात अडकलेले पैसे मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. तुमच्या सन्मानात वाढ होऊ शकते. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात.

Story img Loader