नवसंवत्सर २०७९ शनिवारपासून म्हणजेच २ एप्रिलपासून सुरू होत आहे. यासोबतच दरवर्षी चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते. पंचागानुसार या संवत्सराचे नाव नल असून स्वामी शुक्र असेल. प्रत्येक हिंदू नववर्षाला स्वतःचा राजा, मंत्री आणि मंत्रिमंडळ असते. या नवीन वर्षाचा राजा शनि आणि मंत्री गुरु असेल. या वेळी हिंदू नववर्ष संवत २०७९ अशाच दुर्मिळ योगाने सुरू होत आहे. असं ग्रहांचं मंत्रिमंडळ दीड हजार वर्षांनंतर स्थापन होणार आहे. त्यामुळे या नवीन वर्षाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा संवत्सर शुभ असू शकतो.

ज्योतिषशास्त्रानुसार २९ एप्रिल २०२२ रोजी शनि ग्रह आपली राशी बदलणार आहे. या काळात शनि मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करतील. या राशीत शनिचे संक्रमण होताच मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनि अडीचकीपासून मुक्ती मिळेल. यासोबतच धनु राशीच्या लोकांची साडेसातीपासून सुटका होईल. या संक्रमणामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच, प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.

Grah Transit 2022: एप्रिलमध्ये नऊ ग्रह करणार राशी बदल, ‘या’ राशींसाठी धनलाभाचा योग

एप्रिल महिन्यात प्रथम ग्रहांचा सेनापती मंगळ ७ एप्रिल रोजी शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. यानंतर, व्यवसाय आणि बुद्धिमत्ता देणारा बुध ग्रह ८ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करेल. १३ एप्रिल रोजी देवांचा गुरू बृहस्पती गुरू मीन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. त्यानंतर धन आणि वैभव देणारा शुक्र २७ एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करेल. १२ एप्रिल रोजी मायावी ग्रह राहू मेष राशीत प्रवेश करेल. तर १२ एप्रिललाच केतू ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल. यानंतर २९ एप्रिल रोजी ग्रहांचे न्यायाधीश शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करतील. तसेच, चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी आपली राशी बदलणार आहे. अशा प्रकारे एप्रिलमध्ये ९ ग्रह राशी बदलतील. तीन राशीच्या लोकांना या नवग्रहांच्या संक्रमणाचा विशेष लाभ होऊ शकतो.नवीन वर्षाच्या सुरुवातीला रेवती नक्षत्र आणि तीन राजयोग तयार होत आहेत. याशिवाय, नवीन वर्षाच्या सुरुवातीला मंगळ त्याच्या उच्च राशीत असलेल्या मकर राशीत, राहू-केतू देखील त्याच्या उच्च राशीत (वृषभ आणि वृश्चिक) असतील. दुसरीकडे, शनी स्वतःच्या राशीत मकर राशीत आहे. या कारणास्तव हिंदू नववर्षाच्या कुंडलीत शनि-मंगळाचा शुभ संयोग तयार होत आहे.

Story img Loader