Hindu New Year Lucky Zodiac Signs: यंदा २२ मार्च २०२३ हिंदू नववर्षातील पहिला सण गुढीपाडवा साजरा होणार आहे. यासह २२ मार्च पासून चैत्र नवरात्रीचा सुद्धा आरंभ होत आहे. या शुभ योगासह ग्रह ताऱ्यांची स्थिती कशी असेल याविषयी ज्योतिषतज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार २२ मार्चला शनी-गुरु सह अनेक ग्रह हे आपल्या स्वराशीत तर मंगळ- शुक्र यांसारखे ग्रह हे आपल्या उच्च राशीत स्थिर असणार आहेत. परिणामी १२ राशींवर शुभ- अशुभ प्रभाव दिसून येऊ शकतो. काही राशी या काळात अत्यंत धनवान होऊ शकतील तर काहींना आरोग्याची काळजी घेण्याची गरज भासेल. नेमक्या कोणत्या राशींना गुढीपाडव्यापासून शुभ योग व लाभाच्या संधी आहेत हे आपण जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चैत्र महिन्यात ‘या’ राशी होणार प्रचंड धनवान?

वृषभ (Taurus Zodiac)

वृषभ राशीतून मंगळदेव १३ मार्चलाच मार्गी होऊन मिथुन राशीत प्रवेश घेत आहेत. त्यामुळे वृषभ राशीस केवळ मंगळाच्या शुभ प्रभावाचा लाभ होऊ शकतो व संकटाची स्थिती टळू शकते. तुम्हाला चैत्र मासात लक्ष्मीसह सरस्वतीचेही वरदान लाभण्याची स्थिती आहे. विद्यार्थी दशेतील वृषभ राशीच्या मंडळींना अभ्यासात मन एकाग्र करता येईल तसेच तुमच्या मेहनतीचे गोड फळ सुद्धा मिळू शकते. नोकरदार मंडळींना सुद्धा जबाबदाऱ्या वाढून त्यातून धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला येत्या काळात पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

मिथुन (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या मंडळींसाठी मंगळ ग्रहाचे गोचर हे अधिक शक्तिशाली असणार आहे. तुम्हाला सुरु केलेल्या प्रत्येक कामाला पूर्ततेपर्यंत न्यावे लागेल पण तिथून तुम्हाला प्रचंड धनलाभ व फायदे होण्याची चिन्हे आहेत. तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात अधिक सकारातमक बदल घडून येऊ शकतात. तुमच्या वरिष्ठांसह नाते संबंध दृढ होऊ शकते. तुम्हाला व्यवसायातून अधिक यश लाभू शकते. कामाचा दबाव वाढेल पण मानसिक ताण जाणवणार नाही.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीच्या मंडळींना फार काळापासून हरवलेल्या मानसिक शांतीचा पुन्हा अनुभव घेता येईल. ताणतणावात तुम्हाला आनंदाची झुळूक अनुभवू देणारी एखादी बातमी मिळू शकते. वृश्चिक राशीच्या मंडळींना हृदयाची काळजी घ्यावी लागेल. या काळात विनाकारण जबाबदारी घेणे टाळा. तुम्हाला वाहन खरेदीचे उत्तम योग आहेत. आर्थिक लाभासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

हे ही वाचा<< शनी उदय होताच १२ राशींच्या नशिबाला कशी मिळेल कलाटणी? तुमच्या राशीत धनलाभ की संकट, जाणून घ्या

धनु (Sagittarius Zodiac)

धनु राशीच्या मंडळींना प्रवासाचे योग आहेत. नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला बाहेरगावी स्थायिक होण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला कुटुंब व काम यातील एक पर्याय निवडावा लागू शकतो. संतती सुखाची चिन्हे कुंडलीत दिसत आहेत. याशिवाय लहान भावंडांची जबाबदारी उचलावी लागू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी मन जपून काम करावे लागेल. कौटुंबिक प्रेमाने मन शांत राहण्यास मदत होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindu new year gudhipadwa date chaitra navratri these four lucky zodiac signs to get more money profit astrology news svs