वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातही अनेक ग्रहांच्या राशीत बदल घडणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी ग्रहांचे राजकुमार बुध ग्रह मकर राशीत गोचर करणार आहे. तर १३ फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर १५ फेब्रुवारीला सुख आणि संपत्तीचा दाता शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. ग्रहांच्या गोचरमुळे होळीचा काळ काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. होळीच्या दिवशी चार राशींचे भाग्य उजळू शकते. त्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंह राशी –

फाल्गुन महिना सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरु शकतो. सुदैवाने काही कामे मार्गी लागू शकतात. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल तर या राशीतील लोकांच्या आदेशाचं पालन त्यांची मुल करतील. व्यावसायिकांसाठी होळीचा काळ अनुकूल असून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

मेष –

बुध, शुक्र आणि सूर्य राशीतील बदल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची आणि नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, राग टाळा आणि वादविवादापासून दूर राहा याचा फायदा तुम्हाला भविष्यात मिळू शकतो. या महिन्यात तुम्ही कोणतेही काम करण्याचा निर्णय घ्याल त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे.

धनु –

तीन ग्रहांच्या गोचरमुळे धनु राशीच्या लोकांच्या कामाची प्रशंसा त्यांच्या ऑफिसमध्ये होऊ शकते. तुमच्या कामामुळे वरिष्ठ अधिकारी प्रभावित होतील. तसंच कामाच्या ठिकाणच्या काही महत्वाच्या आणि नवीन जबाबदाऱ्याही मिळण्याची शक्यता आहे. यासह या राशीतील लोकांच्या मान-सन्मानात वाढ होईल. मात्र, कामाच्या लोडमुळे काहींना मानसिक ताण येऊ शकतो. तसंच या काळात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी –

मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात काही शुभ कार्य होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकार्‍यांचे सहकार्य मिळू शकते तसंच या काळात या राशीतील लोक उत्साहाने कामं करतील. आत्मविश्वास वाढू शकतो शिवाय नोकरदार वर्गाला रोजगाराच्या नवीन संधी मिळू शकतात. मात्र यावेळी कामाचा ताणावही वाढण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)