Budhaditya Rajyog In Meen:वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा निश्चित वेळी गोचर करत असतो ज्याचा प्रभाव शुभ अशुभ स्वरूपात मानवी जीवनावर दिसून येतो. येत्या १६ मार्चला सूर्य व बुध ग्रह गोचर करून एकत्र येत आहेत या युतीसह एक अत्यंत शुभ असा बुधादित्य राजयोग तयार होत आहे. या राजयोगाचा प्रभाव १२ राशींवर दिसून येणार आहे त्यातील ३ राशी अशा आहेत ज्यांना येत्या काळात प्रचंड धनलाभ होऊ शकतो. इतकंच नाही तर या राजयोगासह तीन राशींना प्रचंड मान- सन्मान लाभण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वृषभ (Taurus Zodiac)

बुधादित्य राजयोग बनल्याने वृषभ राशीसाठी शुभ व लाभदायक स्थिती तयार होत आहे. हा योग आपल्या राशीच्या इनकम स्थानी तयार होत आहे यामुळे येत्या काळात तुम्हाला प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. येत्या काळात आपल्याला मुख्यतः गुंतवणुकीतून फायदा होण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला गुंतवणूक वाढवण्यसाठी कौटुंबिक साथ गरजेची असेल. आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासह मान- सन्मान वाढण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या विवाहित मंडळींना लवकरच संतती प्राप्तीच्या दृष्टीने शुभ वार्ता मिळू शकते.

मिथुन (Gemini Zodiac)

बुधादित्य राजयोग बनल्याने मिथुन राशीच्या मंडळींना लाभदायक स्थिती अनुभवता येईल. हे गोचर आपल्या राशीच्या कर्म भावी होत असल्याने आपल्या कुंडलीत उलाढाली होऊ शकतात. राजकारणाशी संबंधित मंडळींना येत्या काळात प्रतिष्ठा अनुभवता येऊ शकते. हवे तसे यश व पद प्राप्त करण्यासाठी पुढील संपूर्ण महिना शुभ ठरू शकतो. नोकरीच्या शोधत असलेल्या मंडळींना आपल्या इच्छापूर्तीच्या दिशेने एक नामी संधी हाती लागू शकते. नोकरदार मंडळींना सुद्धा पदोन्नतीसह पगारवाढीचा योग आहेत. या काळात आपल्याला व्यवसाय वाढवण्याची संधी लाभू शकते.

हे ही वाचा<< “देवेंद्र फडणवीसांवर मित्रांकडूनच चिखलफेक…” ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी, म्हणतात, “पक्षातच शत्रू…”

कर्क (Cancer Zodiac)

बुधादित्य राजयोग बनल्याने कर्क राशीच्या मंडळींचे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. बुध व सूर्याचे गोचर आपल्या राशीच्या भाग्य स्थानी तयार होत आहे. म्हणूनच येत्या काळात आपल्याला भाग्याची महत्त्वपूर्ण साथ लाभू शकते. आपल्याला येत्या काळात सुरु केलेले प्रत्येक काम पूर्णत्वाकडे नेता येईल व मुख्यतः यात आपल्याला यश संपादन करता येऊ शकते. विद्यार्थ्यांना येत्या काळात स्पर्धा परीक्षेत उत्तम गुण मिळवता येऊ शकतात. तुम्हाला कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहेत. या काळात आपल्या वडिलांसह नातेसंबंध सुधारता येऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)