Holi 2024 Grahan And Balarista Dosh : वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी म्हणजेच २५ मार्च रोजी होत आहे. मात्र, भारतात हे ग्रहण दिसणार नाही; परंतु ग्रहणाचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर होऊ शकतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या मीन राशीमध्ये सावलीचा ग्रह राहू आहे. सूर्यही मीन राशीत असेल. अशा स्थितीत होळीच्या दिवशी सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे ‘ग्रहण योग’ही तयार होत आहे; ज्यामुळे काही राशींसाठी समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर २४ मार्च रोजी दुपारी २.२० वाजता उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात चंद्र केतूसह कन्या राशीत असेल. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे बालारिष्ट दोष तयार होत आहे. होळीमध्ये ग्रहांच्या अशा स्थितीसह चंद्रग्रहणामुळे काही राशींच्या लोकांना फायदा होईल; तर काही राशींच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊ कोणत्या राशींच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा