Shani Nakshatra Gochar 2024: कर्मदेवता शनी महाराज उदित झाल्यावर आता कुंभ राशीत एक एक पाऊल पुढे जात आहे. होळीनंतर व गुढीपाडव्याच्या आधी ६ एप्रिलला शनी नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. शनी महाराज आतापर्यंत राहूच्या नक्षत्रात होते व आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गुरुच्या पूर्वभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव मेष ते मीन राशींवर कोणत्या स्वरूपात होईल हे जाणून घेऊया..
शनी नक्षत्र गोचराचा मेष ते मीन राशींना ‘असा’ मिळणार लाभ
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
मेष राशीला आर्थिक वृद्धीचे संकेत आहेत. मात्र कुटुंबामध्ये काही अडचणी येऊ शकतात, थोडं सतर्क व्हायची गरज आहे. चांगल्या लोकांशी संपर्क वाढवण्याची गरज आहे. तुमच्या बौद्धिक शक्तीला वाढवण्यासाठी काम करा व वेळ काढा.
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
तुमच्या आर्थिक मिळकतीचे मार्ग मजबूत होतील. जे लोक कमिशनवर काम करतात त्यांना आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नेहमीच्या तुलनेत जास्त काम करावे लागू शकते. कुटुंबाच्या आरोग्याची थोडी चिंता राहील. सणाच्या दिवसात मात्र आनंदी असाल.
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
वरिष्ठ व सहकाऱ्यांशी भांडण होऊ शकते. यात्रेचा योग आहे. प्रवासासाठी शुभ योग आहे. घरातील मंडळींची मने जपण्यासाठी प्रयत्न करा. मिळून मिसळून राहिल्याने काही गोष्टी आपल्या म्हणण्यानुसार होऊ शकतात.
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
कर्क राशीच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते. जुने आजार बरे होऊ शकतात. आपल्याला कामातून ब्रेक घेऊन कुटुंबासह छान वेळ घालवता येऊ शकतो. व्यवसायात गुंतवणूक लाभदायी ठरेल.
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
नात्यांमध्ये सुधारणा होऊ शकते. कामासाठी शनी नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. बचतीचा प्रयत्न करावा जेणेकरून भविष्यात एखादं मोठं संकट आल्यास आपल्याला इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही.
कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पण काहीच काळात तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो ज्यामुळे तुम्ही सक्षम व्हाल. जी मंडळी प्रमोशनही प्रतीक्षा करत आहेत त्यांना या कालावधीत शुभ वार्ता मिळू शकते. प्रवासाच्या वेळी काळजी घ्या.
तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
गुंतवणुकीवर भर द्या. आरोग्याची हेळसांड करू नका. समाजात तुम्हाला तुमची प्रतिमा मान- सन्मानपूर्वक तयार करण्याची संधी शनी देव देऊ शकतात. कुणालाही न मागता सल्ला देऊ नका.
वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)
वृश्चिक राशीच्या मंडळींना प्रॉपर्टीचे व्यवहार फायदेशीर असू शकतात. कामाची दिशा बदलण्यासाठी काही गोष्टी वेगाने घडून येऊ शकतात. शनी महाराज आर्थिक मिळकतीच्या कक्षा रुंदावू शकतात. आई- वडिलांच्या आरोग्याबाबतची चिंता कमी होऊ शकते.
धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)
धनु राशीच्या मंडळींना धार्मिक यात्रेत सहभाग घेता येऊ शकतो. आयुष्यभराची आठवण देऊ शकेल अशी एखादी घटना घडणार आहे. वैवहिक आयुष्यात प्रेमाचा गोडवा वाढेल. मानसिक तणाव सुद्धा वाढू शकतो पण बदलत्या वेगासह जुळवून घेण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही आनंदी राहू शकता.
मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)
मकर राशीसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत लाभदायक असणार आहे. तुमच्या कुंडलीत परदेश प्रवासाची चिन्हे आहेत. तुमच्या दैनंदिन आयुष्यात काही बदल होऊ शकतात. वेळेची गणिते चुकू शकतात पण तुम्हाला नवीन वेगवान आयुष्य आवडू शकते. आपल्या लोकांना नीट वेळ द्या.
कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)
कुंभ राशीच्या मंडळींना करिअरसाठी हे शनी नक्षत्र गोचर लाभदायक ठरू शकते. व्यवसायात वृद्धीचे संकेत आहेत. आपल्याला प्रवासाच्या वेळी गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. अधिक साहसी उपक्रम करायला जाऊ नये. वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो.
हे ही वाचा << ३० एप्रिलपर्यंत करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशी; शुक्राच्या कृपेने जगू शकता राजेशाही जीवन
मीन रास (Pisces Rashi Bhavishya)
मीन राशीसाठी हा कालावधी लाभदायक ठरू शकतो. खर्च सांभाळून करा पण गुंतवणूक टाळू नका. श्रीमंतीसाठी आपल्या नशिबाची साथ मिळू शकते. मनपसंत गोष्टी करा पण इतरांचं विशेषतः आपल्या प्रिय व्यक्तींचं मन दुखावू नका.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)