Gajkesari Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वांत वेगाने भ्रमण करणारा प्रभावशाली ग्रह मानला जातो. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस भ्रमण करतो. चंद्राच्या या राशिबदलाने काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो. चंद्र ५ मार्च रोजी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करेल. जिथे गुरू आधीच स्थित आहे. गुरू आणि चंद्राच्या युतीमुळे एक शक्तिशाली गजकेशरी राजयोग निर्माण होत आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे १२ राशींच्या जीवनावर निश्चितच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या परिणाम होत असतो. पण, १२ पैकी तीन राशींचे भाग्य गजकेसरी राजयोगाने उजळू शकते.
गजकेसरी राजयोगाने ‘या’ राशींना मिळणार नोकरी, व्यवसायात मिळणार पैसा अन् पद
मेष
गजकेसरी राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या राशींच्या लोकांना सकारात्मक वातावरण लाभेल. त्यामुळे ते प्रत्येक शुभ कार्यात यशस्वी होऊ शकतील. आयुष्यात सुरू असलेल्या समस्या कमी होतील. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो. कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल. आयुष्यात आनंदाचे क्षण येतील.
कर्क
गजकेसरी राजयोग कर्क राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. याच्या मदतीने प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते. करिअर क्षेत्रातही पदोन्नती मिळू शकते. तुम्हाला व्यवसायातही नफा मिळेल आणि तुमच्या स्पर्धकांना कडक स्पर्धा देताना दिसेल. आर्थिक स्थिती चांगली असेल, तुम्ही भविष्यासाठी बचतदेखील करू शकाल. कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल.
कन्या
गुरू-चंद्राचा गजकेसरी राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. या काळात कन्या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. त्यामुळे तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता. लव्ह लाईफ चांगले राहणार आहे. नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवता येईल. आरोग्यदेखील चांगले राहील.