Holi Gajkesari Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर राशी किंवा नक्षत्र बदल करतो, ज्याचा परिणाम १२ राशींवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या होत असतो. यात नऊ ग्रहांपैकी चंद्र हा एकमेव ग्रह आहे, जो सर्वात वेगाने फिरतो आणि तो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. यामुळे चंद्राचे कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होऊन शुभ किंवा अशुभ योग तयार होत असतात. यातच होळीपूर्वी वृषभ राशीत गुरु आणि चंद्राच्या संयोगाने गजकेसरी नावाचा एक शक्तिशाली राजयोग तयार होणार आहे.

ग्रहांच्या संयोगाने हा राजयोग दर महिन्याला तयार होतो, ज्याचा काही राशींना भरपूर फायदा मिळतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र ५ मार्च रोजी सकाळी ८ वाजून१२ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करेल, जिथे गुरु ग्रह आधीच स्थित आहे. गुरु आणि चंद्राच्या संयोगामुळे एक शक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण होईल. गजकेसरी राजयोगाच्या निर्मितीमुळे १२ राशींपैकी अशा तीन राशी आहेत, ज्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी असेल.

वृषभ

वृषभ राशीत तयार होणारा गजकेसरी योग वृषभ राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभही मिळू शकतो. कुटुंबासह त्यांचा वेळ चांगला जाईल. करिअरमधील सर्व समस्या संपून प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, या राशीच्या लोकांचे धैर्य वाढेल आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमताही वेगाने वाढेल, ज्यामुळे तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेऊ शकाल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. जर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पैसे गुंतवले तर त्यात तुम्हाला मोठे यश मिळू शकते. गुरुदेवांच्या कृपेने तुमचा अध्यात्माकडील कल अधिक वाढू शकतो.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठीही गजकेसरी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीतील लोकांचा कल अध्यात्माकडे जास्त असू शकतो. तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतील. करिअरच्या क्षेत्रात सकारात्मक परिणाम होऊ शकतो. यासह शिक्षण क्षेत्रातही बरेच फायदे मिळू शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. येणाऱ्या काळात तुम्हाला याचा खूप फायदा होऊ शकतो.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना गजकेसरी राजयोग फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात. संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. गुरुच्या कृपेने तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या मित्रमंडळींकडून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. यामुळे तुमचा दबदबा वाढू शकतो. यासह तुमची नेतृत्व क्षमता वाढू शकते, ज्यामुळे तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

Story img Loader