Shash And Malavya Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदल करतो, ज्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम प्रत्येक राशीवर होत असतो. यात १४ मार्च रोजी होळीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत. या दिवशी शुक्र मीन राशीत स्थित असेल ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होईल तर शनी कुंभ राशीत असल्याने शश राजयोग होईल. याशिवाय, सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग निर्माण होईल. तर शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत, या राजयोगांच्या निर्मितीमुळे होळीला काही राशींना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. या राशींविषयी जाणून घेऊ..

कुंभ राशी

शनी कुंभ राशीत असल्याने शश व मालव्य राजयोग तयार होईल, यामुळे कुंभ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. भौतिक सुखे मिळू शकतात. कुटुंबासह चांगला वेळ जाईल. आत्मपरीक्षणासाठी हा उत्तम काळ असेल, ज्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये बरेच बदल घडवून आणू शकता. अध्यात्माकडे अधिक कल असेल. कुटुंबात सुरू असलेले वाद संपुष्टात येऊ शकतात. तुमच्या खूप दिवसांपासून प्रलंबित असलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल. जीवनात आनंद आणि शांती नांदेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळात खूप फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही जे काम करता त्यात तुम्ही खूप यशस्वी होऊ शकता. समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. यासह तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंब आणि जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते तसेच आर्थिक लाभही मिळू शकतो. तुम्ही कुटुंब किंवा मित्रांबरोबर अनेक धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकता. यासह तुमचा कुटुंबासह चांगला वेळ जाईल. मुलांकडून येणाऱ्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. यासह तुम्हाला त्यांच्याकडून काही चांगली बातमी देखील मिळू शकते. तुमच्या करिअरमधील समस्या आता संपतील आणि तुम्हाला पदोन्नती मिळू शकेल. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतील.

Story img Loader