Daily Prediction For Zodiac Signs : आज १३ मार्च २०२५ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी सकाळी १० वाजून ३६ मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर पौर्णिमा तिथी सुरू होईल. धृति योग दुपारी १ वाजून ३ मिनिटांपर्यंत जुळून येईल. तसेच उद्या सकाळी ६ वाजून २० मिनिटांपर्यंत पूर्वा भाद्रपद नक्षत्र जागृत असणार आहे. याशिवाय आज होळी हा सण साजरा केला जाणार आहे. होळीच्या अग्नीत धान्य, नारळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य टाकून तिला हार फुले वाहून होळीच्या भोवती प्रदक्षिणा घालून प्रार्थना करतात. होलिका दहन हा वाईटावर सकारात्मक दैवी शक्तींच्या विजयाचा उत्सव आहे. तर आजचा दिवस कोणासाठी शुभ असणार हे आपण जाणून घेऊया…
१३ मार्च पंचांग व राशिभविष्य :
मेष:- दूरच्या प्रवासाचा योग येईल. जास्त धाडस करू नका. व्यावसायिक प्रगतीचे दार उघडेल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. कामात चंचलता आड आणू नका.
वृषभ:- व्यावसायिक बदलाचे वारे मनात वाहू लागतील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. तब्बेतीच्या तक्रारी कमी होतील. जोडीदाराचे कौतुक केले जाईल.
मिथुन:- मनातील आकांक्षा विनासायास पूर्ण होतील. तरुण वर्गाने कसलीही घाई करू नये. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. जोडीदाराविषयी मतभेद संभवतात.
कर्क:- महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्यावी. वरिष्ठांना नाराज करू नका. धार्मिक कार्याचा लाभ घ्यावा. भावंडांची काळजी लागून राहील. कलाकारांना प्रसिद्धी मिळेल.
सिंह:- तुमचा मनमोकळा स्वभाव इतरांच्या नजरेत भरेल. वरिष्ठांच्या शाबासकीस पात्र व्हावे. प्रेमप्रकरणातील जवळीक त्रासदायक ठरू शकते. कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. जवळचा प्रवास घडेल.
कन्या:- मुलांचा व्रात्यपणा वाढू शकतो. कामात चिकाटी ठेवावी लागेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या कामातून लाभ संभवतो. अति अपेक्षा बाळगू नका.
तूळ:- हाती सोपवलेले काम वेळेत तडीस न्याल. कामात कसलीही घाई उपयोगाची नाही. डोके ठिकाणावर ठेवून वागावे. कौटुंबिक बाजू ध्यानात घेऊन वागावे. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
वृश्चिक:- जोडीदाराशी अनबन टाळावी. स्वकष्टाने आर्थिक बाजू सुधाराल. आपल्या वागण्याने कोणी दुखवणार नाही याची काळजी घ्यावी. सत्य-असत्याची खातरजमा करावी. फसवणुकीपासून सावध राहावे.
धनू:- बाह्यरुपावर भुलू नका. काटकसरीचा मार्ग अवलंबाल. नवीन आव्हानाला सामोरे जाल. तुमची काम करण्याची शक्ति वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल.
मकर:- सर्वांशी मधुर वाणीने बोलाल. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. तुमच्या संभाषणाची उत्तम छाप पडेल. कामात अधिक उत्साह येईल. तुमची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.
कुंभ:- व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. काही गोष्टींचे धोरण ठरवावे लागेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवावी. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. तुमची मानमान्यता वाढेल.
मीन:- नैराश्याला बळी पडू नका. फसवणुकीपासून सावध राहावे. मैत्रीचे नाते जपावे. जमिनीच्या कामास गतीमानता येईल. अति श्रमाचा थकवा जाणवेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
© IE Online Media Services (P) Ltd