Holi 2024 Marathi Panchang 24th March Rashi Bhavishya: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार २४ मार्च २०२४ ला फाल्गुन शुक्ल पक्षातील चतुर्दशीला होलिका दहन होणार आहे. आजच्या दिवशीच या वर्षातील पहिले चंद्र ग्रहण सुद्धा असेल. तसेच ग्रहमान पाहता आज चार शुभ योग सुद्धा जुळून आले आहेत. २४ मार्च २०२४ च्या रात्री १० वाजून २७ मिनिटांपासून ते १२ वाजण्याआधीपर्यंतचा कालावधी होलिका दहनासाठी शुभ आहे. आज दुपारी १२ वाजून ३ मिनिटांपासून ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. तसेच सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि अमृत सिद्धी योग आज दिवसभरात अनुक्रमे पहाटे, सकाळी व मध्यान्हाच्या वेळी जागृत असतील. आजची होलिका दहनाची तिथी मेष ते मीन राशीला कशी जाणार पाहूया..
होळी २०२४: मेष ते मीन राशींचे भविष्य
मेष:-घरातच मन रमेल. घरात टापटीप ठेवाल. जुनी पुस्तके काढून वाचत बसाल. चटपटीत पदार्थ खाल. दिवस मजेत घालवाल.
वृषभ:-मित्रांशी गप्पा माराल. जवळचा प्रवास कराल. नवीन गोष्टींची माहिती जमवाल. भावंडांशी सलोखा वाढेल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल.
मिथुन:-पत्नीचा सहवास हवाहवासा वाटेल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. फार थंड पदार्थ खाऊ नयेत. काही कामे उगाचच अडकून पडतील. स्वप्नात रमून जाल.
कर्क:-उगाचच घाई-घाई करू नका. आपल्या मर्जीने वागाल. बाहेरील गोष्टींचा फार विचार करू नका. चंचलतेवर मात करावी. मनातील आकांक्षा पूर्ण होईल.
सिंह:-विचारात वाहून जाऊ नका. मानसिक स्थैर्य जपावे. हातातील कला सर्वांसमोर सादर करता येईल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. भागीदारीत नफा मिळेल.
कन्या:-इतरांचा विश्वास संपादन करावा. हातातील कामात यश येईल. घरगुती प्रश्न सोडवावेत. नातेवाईकांची मदत मिळेल. आत्मविश्वास सोडून चालणार नाही.
तूळ:-गैरसमजाला मनात जागा देऊ नका. मुलांशी खेळण्यात वेळ घालवाल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी. गृहशांती जपावी लागेल. मुलांची मते जाणून घ्यावीत.
वृश्चिक:-धाडस करतांना सतर्क राहावे. शाब्दिक चकमक टाळावी. हातापायांना किरकोळ इजा संभवते. कामातून समाधान शोधावे. जोडीदाराचे सौख्य वाढीस लागेल.
धनू:-फसवणुकीपासून सावध राहावे. बाहेर फिरताना मौल्यवान गोष्टी सांभाळाव्यात. अनाठायी खर्च होऊ शकतो. अपयशाने खचून जाऊ नका. धार्मिक गोष्टीत मन रमवा.
मकर:-अडथळ्यातून मार्ग काढावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. आततायीपणे निर्णय घेऊ नका. इतरांच्या मनाचा विचार करावा. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल.
कुंभ:-अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. चित्त एकाग्रतेसाठी ध्यानधारणा करावी. गरज नसतांना खर्च करू नका. आपली संगत तपासून पहावी. जबाबदारीची जाणीव ठेवावी.
हे ही वाचा<< होळीला चंद्र ग्रहण व ४ दुर्मिळ योग बनल्याने ‘या’ राशींच्या नशीबाचं टाळं उघडणार; ‘अशा’ रूपात दारी येईल लक्ष्मी?
मीन:-काही कामे वेळ घालवतील. उगाचच खिळून पडल्यासारखे वाटू शकते. मनातील भीती बाजूला सारावी. स्वत: साठी वेळ बाजूला काढावा. उष्णतेचा त्रास जाणवेल.
-ज्योतिषी विद्याधर करंदीकर