Today Rashi Bhavishya, 03 December 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

आध्यात्मिक प्रगती चांगली करता येईल. मनात नसत्या चिंता निर्माण होऊ शकतात. अति विचारात गुंतून जाऊ नका. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत.

Ratha Saptami 2025
Ratha Saptami 2025: रथ सप्तमीला सूर्याला प्रसन्न करण्यासाठी कशी करावी पूजा? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
shani gochar positive impact
आता नुसता पैसा! शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार नवी नोकरी, वैवाहिक सुख अन् गडगंज श्रीमंती
basant panchami 2025 shani gochar saturn transit in purvabhadra nakshatra second stage positive effect on these zodiac sign
वसंत पंचमीला न्यायदेवता शनी करणार नक्षत्र परिवर्तन! या ३ राशींचे नशीब चमकणार, कर्मफळ दाता करणार प्रत्येक इच्छा पूर्ण
Venus Planet Gochar In Meen
१२४ दिवसांनंतर धनाचा दाता शुक्र ग्रह परम उच्च स्थानी! ‘या’ ३ राशीच्या लोकांच्या संपत्तीमध्ये होईल अपार वाढ, पद-प्रतिष्ठा वाढणार
Hanuman Favourite people
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर नेहमी असते हनुमानाची विशेष कृपा, कायम मिळतो पैसाच पैसा!
Surya Shani Yuti 2025
Surya Shani Yuti 2025: पिता-पुत्रांची होणार युती, सूर्य-शनिचा दुर्लभ योग ‘या’ चार राशींना देईल बक्कळ धनलाभ? गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात…
jupiter and venus conjuction 2025
Gajalakshmi Rajyog: येत्या काही दिवसात ‘या’ तीन राशीचे लोक कमावणार बक्कळ पैसा अन् भौतिक सुख; ‘गजलक्ष्मी राजयोग’ घेऊन येणार आनंदी आनंद

वृषभ:-

नवीन मित्र जोडता येतील. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वकष्टावर भर द्यावा. मनातील आकांक्षा पूर्ण होईल. काही नवीन खरेदी केली जाईल.

मिथुन:-

व्यवसायात चांगला लाभ मिळेल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. वडीलांकडून मदत घेता येईल. कमिशनमध्ये लाभ होईल. आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

कर्क:-

आत्मविश्वासाने वागाल. दिवस मौजमजेत घालवाल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. आपल्या आवडत्या कामावर लक्ष द्यावे. मानसिक समाधान लाभेल.

सिंह:-

एखादी चांगली संधी चालून येईल. दानधर्म कराल. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो. धार्मिक स्थळाला भेट देता येईल. आज उधार देणे टाळावे.

कन्या:-

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. भागीदाराशी सलोखा वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल..

तूळ:-

अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. मनात अकारण भीती निर्माण होऊ शकते. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. परिस्थितीला नवे ठेऊ नका. उगाच चिडचिड करू नका.

वृश्चिक:-

मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील. आपले आवडते छंद जोपासा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. त्यांच्या आनंदाने खुश व्हाल.

धनू:-

कौटुंबिक सौख्यात दिवस घालवाल. मानसिक समाधान लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मनातील चिंता दूर साराव्यात.

मकर:-

लहान प्रवास घडेल. कामात पत्नीची साथ मिळेल. भावंडांशी सुसंवाद साधला जाईल. मानसिक चांचल्य जाणवेल. कसलीही हार मानू नका.

कुंभ:-

कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे. चोरांपासून सावध राहावे. जामीनकीचे व्यवहार आज टाळावेत. फसवणुकीपासून सावधानता बाळगा. मामाकडून मदत घेता येईल.

मीन:-

मुलांच्या हुशारीने हुरळून जाल. त्यांचे कोडकौतुक कराल. दिवस आनंदात जाईल. प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक प्रश्न सुटेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader