Daily Horoscope 1 August 2023: जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळा. दिवस संमिश्र फलदायी. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. जुनी कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. मानसिक क्षमता वाढीस लागेल.

१२ महिन्यांनंतर शुक्र ग्रह गुरुच्या घरामध्ये गोचर, या ३ राशींच्या लोकांना मिळेल अपार पैसा आणि पद-प्रतिष्ठा
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Rashi Bhavishya & Panchang 7th October | shardiya Navratri 2024 | lalita panchami
०७ ऑक्टोबर पंचांग : ललिता पंचमीचा शुभ दिवस ‘या’ राशींच्या आयुष्यात आणेल सौभाग्य, संपत्ती आणि सुखाचे क्षण! वाचा तुमचे राशीभविष्य
6th october rashi bhavishya panchang in marathi
६ ऑक्टोबर पंचांग : अश्विन महिन्यातील विनायक चतुर्थी अन् देवी कुष्मांडाचा दिवस; आज १२ पैकी ‘या’ राशींवर होईल धन-संपत्तीचा वर्षाव
Shardiya Navratri 2024
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ‘या’ गंभीर चुका टाळा अन् देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ‘या’ गोष्टी करा
guru vakri 2024 | Jupiter Vakri In Taurus in Navratri after 12 years
१२ वर्षानंतर नवरात्रीमध्ये गुरू होणार वक्री, ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार, मिळणार अपार धनलाभ
shani nakshatra gochar 2024
पुढचे १८१ दिवस शनी देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी
Surya transit in libra
नवरात्रीनंतर पैसाच पैसा! सूर्याच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार यश, मानसन्मान आणि भौतिक सुख

वृषभ:-

मध्यवर्ती भूमिका स्वीकारताना काळजी घ्या. वैचारिक गुंतागुंत टाळावी. जमिनीच्या कामात लाभ संभवतो. घराची जुनी कामे निघू शकतात. तुमच्यातील कौशल्याचा वापर करावा.

मिथुन:-

सावध पवित्रा घ्यावा. संपूर्ण खात्री करूनच कामे करावीत. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामाच्या स्वरुपातील बदल लक्षात घ्यावेत. व्यापारात जोखीम घेताना सावध राहावे.

कर्क:-

विनाकारण तोंडसुख नको. भावनिक ताण घेऊ नका. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. घरगुती वापराच्या वस्तू खरेदी कराल.

सिंह:-

आर्थिक बचतीवर लक्ष ठेवा. खाजगी समस्या सामंजस्याने सोडवाल. कामे झपाट्याने पार पाडाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. हातातील संधी सोडू नका.

कन्या:-

आवडत्या कामासाठी वेळ मिळेल. लहान मुलांकडून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. भावनाप्रधान होऊ नका. तुमचे मनोबल वाढीस लागेल. हित शत्रूंवर मात करता येईल.

तूळ:-

कौटुंबिक वादळ संयमाने सोडवावे. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. भागीदाराची बाजू समजून घ्या. मित्राकडे मनमोकळे करावे. सकारात्मक परिवर्तन घडेल.

वृश्चिक:-

काही निकष ठरवावे लागतील. शेजार्‍यांना मदत कराल. कामात कुचराई करू नका. गुंतवणूक करताना सावध राहावे. मनात उगाचच शंका निर्माण होईल.

धनू:-

गरज समजून कामे हाती घ्या. घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. अनावश्यक खर्च टाळावा. मानसिक शांतता लाभेल. दिवसभर कामाची ऊर्जा टिकून राहील.

मकर:-

वादाचे मुद्दे समोर आणू नका. भावंडांना समजून घ्यावे लागेल. शक्यतो प्रवास टाळलेलाच बरा. अकल्पित लाभाची शक्यता. वरिष्ठ अधिकार्‍यांची मदत मिळेल.

कुंभ:-

अवाजवी खर्च वाढतील. उगाचच सढळ हाताचा वापर करू नका. जुन्या आठवणी दाटून येतील. संध्याकाळी बाहेर जाणे टाळावे. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्यावे.

मीन:-

मुलांना अभ्यासात मदत कराल. काटकसर करावी लागू शकते. मानसिक अस्थिरता जाणवेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. वरिष्ठांशी ताळमेळ साधावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.