Today Rashi Bhavishya, 10 June 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

आवडीचे पदार्थ खायला मिळतील. तुमच्या कामात हळूहळू सुधारणा करता येईल. संपर्कातील लोकांचे सहकार्य मिळेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. जोडीदाराची निवड ग्राह्य मानावी लागेल.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Year Ender Top Bollywood Stars Of 2024
Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी
chatura loksatta marathi news
स्त्री आरोग्य : नववर्षाचा संकल्प; फिट राहा!
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”

वृषभ:-

तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कौटुंबिक कामाचा ताण वाढेल. कामे आपल्या मर्जीनुसार करण्यावर भर द्याल. समोरील प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. मनाची द्विधावस्था टाळावी.

मिथुन:-

मित्रत्वाची भावना जोपासाल. मानसिक ताण हलका करण्याचा प्रयत्न करावा लागेल. निराशाजनक विचार मनातून काढून टाकावेत. धार्मिक कामात मन गुंतवावे. व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवावे.

कर्क:-

कामातील सक्रियता वाढवावी लागेल. गरज भासल्यास अधिकार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा. मानसिक चंचलता जाणवेल. मनातील संकोच दूर सारावा. जोडीदाराविषयी मनात शंका आणू नका.

सिंह:-

स्वमूल्ल्यावर कामे करत राहाल. व्यावसायिक लाभाबाबत सतर्क राहावे. आत्मविश्वासाने परिपूर्ण वृत्ती अंगीकारू शकाल. आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष नको. पाठदुखी सारखे त्रास जाणवू शकतात.

कन्या:-

इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. जोडीदाराची समजूत काढावी लागेल. मदतीचा हात सदैव पुढे कराल. तुमचा दृष्टीकोन बदलून पहा. भागीदारीत अधिक लक्ष घाला.

तूळ:-

योग्य पथ्ये पाळावीत. पोटदुखी सारखे त्रास जाणवू शकतात. काही कामे जलद गतीने मार्गी लागतील. सासुरवाडीची मदत घेता येईल. अधिकार्‍यांच्या विरोधात कामे करू नका.

वृश्चिक:-

कोणत्याही वाटाघाटी करताना सावध राहावे. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. भागीदारीत विशेष लक्ष घालावे. वारसाहक्काच्या कामातून लाभ होईल.

धनू:-

आर्थिक चढ-उतार लक्षात घ्यावेत. नवीन धाडस करताना सारासार विचार करावा. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. अनाठायी खर्च वाढू शकतो.

मकर:-

कामाच्या ठिकाणी आळस करू नका. इतरांच्या सल्ल्याने वागताना विचार करावा. एकमेकांचे सुख-दुःख नीट जाणून घ्या. नातेवाईकांची मनधरणी करावी लागू शकते. भिन्नलिंगी व्यक्तीला आकर्षित करू शकाल.

कुंभ:-

बोलताना भान राखावे लागेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरातील गोष्टींबाबत फार दक्ष राहाल. मनातील आतुरता वाढीस लागेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

मीन:-

स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. कामे अधिक जोमाने कराल. काही स्वतंत्र मते मांडाल. संपूर्ण विचारांती कृती करावी. भावंडांचे सहकार्य मिळेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Story img Loader