Today Rashi Bhavishya, 11 December 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

मनाची चलबिचलता जाणवू शकते. लहान प्रवास चांगला होईल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.

Grah Gochar 2025 shukra gochar purva bhadrapad nakshatra
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
16 January 2025 panchang and rashi bhavishya
१६ जानेवारी राशिभविष्य: नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा, दिवसाच्या सुरूवातीस लाभ; गुरुवारी कोणत्या राशींना स्वामींचा कसा मिळणार आशीर्वाद?
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
meen Rashi Bhavishya 2025 in Marathi
Pisces Yearly Horoscope 2025: २०२५ मध्ये ‘या’ राशीच्या मेहनतीचे होईल चीज! अनेक समस्यांमधून होईल सुटका; सोनल चितळेंकडून १२ महिन्यांचे राशिभविष्य जाणून घ्या
Daily Horoscope 12 January 2025 In Marathi
१२ जानेवारी राशिभविष्य: रविवारी ब्रम्ह योग कोणत्या राशीसाठी ठरणार शुभ? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाचे जुने प्रश्न लागतील मार्गी
shukra-shani Yuti
तब्बल ३० वर्षानंतर निर्माण होणार धनाढ्य योग! शनि-शुक्राच्या युतीने ‘या’ तीन राशींवर धन-सुखाची बरसात; व्यवसायातून मिळेल बक्कळ पैसा
Navpancham rajyog 2025 in astrology
१३ जानेवारीच्या नवपंचम योगाने ‘या’ राशींचे लोक होणार कोट्यवधींचे मालक! मिळेल नोकरीत बढती, बक्कळ पैसा अन् सुख

वृषभ:-

आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन:-

 उगाच कोणाच्या भरवश्यावर राहू नका. आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या. कार्यालयीन सहकार्‍यांची मदत मिळेल. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल, व्यावसायिक गोष्टीत याचा उपयोग होईल.  

कर्क:-

जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. भावनेला आवर घालावी लागेल. घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. कामातील निर्णय योग्य ठरतील.

सिंह:-

अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. इतरांच्या मनीचे गुज जाणून घ्या. संमिश्र घटना घडू शकतात. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरणात रमाल.

कन्या:-

काही गोष्टी नरमाईने घ्या. भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कामाची धांदल उडू शकते.

तूळ:-

अहंकाराला खतपाणी घालू नका. बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. मदतीला मागे हटु नका. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.

वृश्चिक:-

क्रोधवृत्तीला आवर घालावी. अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवा. अति विचार करू नका.

धनू:-

पराक्रमाला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.

मकर:-

कामातून समाधान लाभेल. नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. कमिशन मधून लाभ कमवाल. वडिलांचे सहकार्य मिळेल.

कुंभ:-

जुगारातून लाभ संभवतो. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या खोडकरपणात रमून जाल. दिवस खेळीमेळीत जाईल.

मीन:-

काहीशी मानसिक शांतता लाभेल. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका. घरगुती वातावरण हसते-खेळते राहील. जोडीदाराची चंगाली साथ मिळेल. भागीदारीत फार विसंबून राहू नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader