Today Rashi Bhavishya, 12 December 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. गरजूंना मदत कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

Grah Gochar 2025 shukra gochar purva bhadrapad nakshatra
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
16 January 2025 panchang and rashi bhavishya
१६ जानेवारी राशिभविष्य: नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा, दिवसाच्या सुरूवातीस लाभ; गुरुवारी कोणत्या राशींना स्वामींचा कसा मिळणार आशीर्वाद?
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
meen Rashi Bhavishya 2025 in Marathi
Pisces Yearly Horoscope 2025: २०२५ मध्ये ‘या’ राशीच्या मेहनतीचे होईल चीज! अनेक समस्यांमधून होईल सुटका; सोनल चितळेंकडून १२ महिन्यांचे राशिभविष्य जाणून घ्या
Daily Horoscope 13 January 2025
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
Daily Horoscope 12 January 2025 In Marathi
१२ जानेवारी राशिभविष्य: रविवारी ब्रम्ह योग कोणत्या राशीसाठी ठरणार शुभ? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाचे जुने प्रश्न लागतील मार्गी
Navpancham rajyog 2025 in astrology
१३ जानेवारीच्या नवपंचम योगाने ‘या’ राशींचे लोक होणार कोट्यवधींचे मालक! मिळेल नोकरीत बढती, बक्कळ पैसा अन् सुख

वृषभ:-

कौटुंबिक वादात पडू नका. कोणतेही वचन देताना सावध रहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. बचतीकडे लक्ष द्यावे. नवीन योजनांवर लक्ष केन्द्रित करावे.

मिथुन:-

आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. निर्णय तुमच्या बाजूचा असेल. मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या. व्यवसायीकांनी संधीचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल.

कर्क:-

आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. दिवस कलासक्त असेल. वरिष्ठांना खुश कराल. मित्रांविषयी गैरसमज होऊ शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील.

सिंह:-

मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी. पायाची दुखणी संभवतात. विद्यार्थांचे प्रश्न सुटतील.

कन्या:-

व्यवसायिकांना लाभदायक दिवस. मनातील इच्छा पूर्ण कराल. सर्व गोष्टीत आनंद वाटेल. बोलतांना सांभाळून शब्द वापरा. नातेवाईकांना नाराज करू नका.

तूळ:-

आपल्याच मतावर अडून राहाल. इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. कामाची धांदल राहील.

वृश्चिक:-

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मैत्रीत गैरसमज होण्याची शक्यता. डोकेदुखीचा त्रास संभवतो. पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.

धनू:-

जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. दिवस मध्यम फलदायी. वैचारिक स्थिरता ठेवावी. नियमांना तडा जाऊ देऊ नका.

मकर:-

लहान आजरांकडे लक्ष ठेवा. चालढकल करू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. चारचौघात कौतुक होईल.

कुंभ:-

भागीदारीत फार विसंबून राहू नका. बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. नवीन उत्पादने घेऊ शकाल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या.

मीन:-

स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल. अतिघाईत निर्णय घेऊ नका. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल. व्यावसायिक विकास शक्य होईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader