Today Rashi Bhavishya, 13 April 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

पैज जिंकता येईल. कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्याल. मानसिक चंचलता जाणवेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. आपल्या मतावर ठाम राहाल.

Surya-Ketu yuti these three zodic sign
सूर्य-केतूची युती देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचांग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
Till Anant Chaturdashi With Bappa's blessings
अनंत चतुर्दशीपर्यंत पैसाच पैसा; बाप्पाच्या आशीर्वादाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार मालामाल
After 33 days money Jupiter will be retrograde in Taurus
३३ दिवसानंतर पैसाच पैसा; वृषभ राशीत गुरू होणार वक्री, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार भरपूर यश
6th September rashibhaviya & Marathi panchang
हरितालिका तृतीया, ६ सप्टेंबर पंचांग: नात्यात गोडवा तर मित्रांकडून लाभ, मेष ते मीन पैकी कोणाचा सुख-समाधानात जाणार शुक्रवार; वाचा तुमचे भविष्य
lokrang
पडसाद: तार्किक बुद्धी वापरावी
September 2024 Grah Rashi Parivartan in Marathi
सप्टेंबर सुरु होताच ‘या’ राशींच्या व्यक्तींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? ३ मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, कुणाला होणार फायदा?

वृषभ:-

कामातील चिकाटी सोडू नका. क्षुल्लक कारणांमुळे नाराज होवू नका. खोट्या गोष्टींचा आधार टाळावा. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. घरगुती जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.

मिथुन:-

भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. तरूणांशी मैत्री कराल. ओळखीतील लोकांचा फायदा होईल. व्यावहारिक कल्पकता दाखवाल. व्यावसायिक गोष्टींचा योग्य अंदाज बांधावा.

कर्क:-

फायदेशीर गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. स्त्री सौख्याचा लाभ होईल.

सिंह:-

काहीसे धोरणीपणे वागाल. अडचणींवर मात करता येईल. सुट्टीतील प्रवासाचे नियोजन कराल. बौद्धिक चुणूक दाखवण्यास वाव मिळेल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल.

कन्या:-

धार्मिक कामात मन रमवाल. वडीलधार्‍यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मुलांचे वागणे दुराग्रही वाटू शकते. अती विचार करू नका.

तूळ:-

जोडीदाराच्या स्वभावाचे कौतुक कराल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागेल. कौटुंबिक बाबी शांततेच्या मार्गाने घ्याव्यात. व्यावसायिक लाभाचा दिवस.

वृश्चिक:-

भावंडांना मदत कराल. जोडीदाराचे विचार समजून घ्या. कामाच्या ठिकाणी तुमचा वाचक राहील. प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल. आरोग्यात सुधारणा होईल.

धनू:-

बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. फार चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल.

मकर:-

मानसिक स्थैर्य जपावे. सारासार विचार करून निर्णय घ्यावा. कोणत्याही प्रकारचा आततायीपणा बारा नव्हे. मैत्रीचे संबंध दृढ होतील. अचानक धनलाभ संभवतो.

कुंभ:-

सामुदायिक गोष्टींचे भान राखा. जोडीदाराच्या प्रेमळ सौख्यात रमून जाल. भावंडांची मदत घेता येईल. योग्य परिक्षणावर भर द्या. कामातील महत्त्वाच्या बाबी जाणून घ्याव्यात.

मीन:-

व्यावहारिक बुद्धिमत्ता दर्शवाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाचा पुरेपूर आनंद मिळवाल. मैत्रीचे नाते जपावे. व्यावसायिक वृद्धीचे नियोजन करावे.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर