Today Rashi Bhavishya, 14 May 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:-
व्यावहारिक कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कचेरीची कामे मनाजोगी पार पडतील. कागदपत्रे नीट तपासून घ्या. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे.
वृषभ:-
जोडीदाराकडून लाभ होतील. आवडीच्या गोष्टींना वेळ मिळेल. मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता. गोडीने कामे साधून घेण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक कामात हातभार लावाल.
मिथुन:-
दुसर्यावर अवलंबून राहू नका. कामात त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक कामे सावधानतेने करावीत. गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल. क्षणिक आनंदाने खुश व्हाल.
कर्क:-
खेळीमेळीत दिवस जाईल. घरात सर्व गोष्टीत टापटीपपणा ठेवाल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. सहकार्यांना कामात मदत कराल.
सिंह:-
जवळच्या प्रवासाचा योग येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. भावंडांना भेटण्याचा योग येईल. वडीलधार्यांचा आशीर्वाद मिळेल. जोडीदाराचा स्वभाव आग्रही राहील.
कन्या:-
कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. कामात घाई गोंधळ उडू शकतो. योग्य नियोजनावर भर द्यावा. काही गोष्टी अचानक घडू शकतात. चटपटीत पदार्थ खाल.
तूळ:-
दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा. व्यवसायानिमित्त प्रवास घडेल. अचानक धनलाभाच्या घटना घडतील. तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. कामात अधिक कष्ट पडतील.
वृश्चिक:-
मनाच्या चंचलतेला आवर घालावी. जोडीदाराच्या शब्दाला प्रमाण मानावे लागेल. भावंडांना मदत करावी लागेल. भागीदारीतून लाभ होईल. पतीच्या कमाईत वाढ होईल.
धनू:-
मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील. तुमच्यातील साहस वाढेल. नवीन अधिकार सावधानतेने वापरा. इतरांवर अधिक विसंबून राहू नका. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा.
मकर:-
कामाला चांगली गती येईल. गोड शब्दातून संवाद साधावा. कामातून चांगले समाधान मिळेल. हातातील कामात यश येईल. दिवस चांगल्या कमाईचा असेल.
कुंभ:-
आर्थिक व्यवहार सतर्कतेने करावेत. घरात तुमचा रूबाब राहील. इतरांना परोपकाराचे महत्त्व पटवून द्याल. जोडीदाराच्या सल्ल्याने वागावे लागेल. बौद्धिक छंद जोपासता येतील.
मीन:-
जास्त अधीर होऊ नका. लष्कराच्या भाकर्या भाजायला जाऊ नका. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा. घरातील वातावरण खेळकर राहील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर