२०२३ हे वर्ष सरण्यास आणि नवीन वर्ष सुरू होण्यास काहीच महिने बाकी आहेत. प्रत्येकजण नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असते. प्रत्येकाला वाटते की नवीन वर्ष हे त्यांच्यासाठी आनंदाने भरलेले तसेच प्रगतीचे जावे. पुढील वर्षात अनेक ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. यातच देवगुरु बृहस्पती मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. देव गुरुच्या राशी परिवर्तनामुळे २०२४ मध्ये काही राशींना आयुष्यात सुख समृध्दी, आणि अपार धन मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढील वर्षात ‘या’ राशींचे सुखाचे दिवस?

वृषभ राशी

देवगुरुचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी पुढील वर्षात लाभदायी ठरु शकते. या राशीतील मंडळींना येत्या वर्षात नोकरी आणि रोजगाराच्या नवी संधी मिळू शकतात. आयुष्यात अनपेक्षितपणे चांगल्या घटना घडू शकतात. नव वर्षात उद्योगपती आणि ग्लॅमर्स क्षेत्राशी निगडीत लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीतून चांगला लाभ होऊ शकतो.

(हे ही वाचा : वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर ‘या’ राशी होणार कोट्याधीश? राहू-केतू-शनिदेवाच्या गोचराने मिळू शकतो प्रचंड पैसा )

सिंह राशी

येणारे नवीन वर्ष २०२४ सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस घेवून येणारे ठरु शकते. या कालावधीत व्यवसायात तुम्हाला मोठी डिल मिळू शकते. शेअर मार्केटमधून पैसे मिळू शकतात. राजकारणात सक्रिय लोकांसाठी हा सूवर्ण काळ ठरु शकतो. वडिलोपार्जित संपत्तीचाही फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळू शकते. या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हे येणारे वर्ष खूप चांगले जाऊ शकते.

मकर राशी

मकर राशीतील लोकांसाठी येणारे नवे वर्ष बंपर लाभ घेऊन येणारे ठरु शकते. या नवीन वर्षात मकर राशींच्या लोकांना सुख, समृध्दी आणि भरपूर धन मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. अपेक्षित फळ आणि प्रसिद्धी मिळू शकते. संपत्तीत भरभराट होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी यश आणि प्रसिद्धी मिळू शकते. या राशीतील लोकांना लोकांकडून भरभरुन प्रेम मिळू शकतो. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)