Rahu Ketu Gochar 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळी आपली राशी बदलतो. ग्रहांच्या बदलांचा चांगला वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. राहू आणि केतू १८ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. आता ३० ऑक्टोबर रोजी राहू-केतूने राशी परिवर्तन केले आहे. राहू ग्रहाने मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश केलाय. तर दुसरीकडे केतू ग्रहाने तूळ राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश केलाय. राहू-केतूची चाल बदलल्यामुळे काही राशींना येत्या नवीन वर्षात प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. पाहा कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

कन्या राशी

राहू-केतूच्या बदलाचा कन्या राशीतील लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पगारात वाढ होऊन उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. वाहन किंवा घराचे सुख मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा किंवा मोठी डील मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात यश मिळू शकतो. कुटुंबात सुख-समृद्धी नांदण्याची शक्यता आहे. 

(हे ही वाचा : १४० दिवसानंतर शनिदेव प्रत्यक्ष मार्गी; आजपासून ‘या’ राशींना देणार आर्थिक लाभाच्या संधी? होऊ शकतात लखपती)

कुंभ राशी

राहू-केतूचे गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. या काळात भागीदारीतील कामे फायदेशीर ठरू शकतात. या लोकांना अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात. त्यामुळे आर्थिक समस्या दूर होऊ शकते. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात कुटुंबासोबत चांगला वेळ घालविता येऊ शकतो.

मकर राशी

या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. व्यवसायात चांगली ऑर्डर मिळाल्याने पैसे मिळू शकतात. या काळात न्यायालयीन प्रकरणांमध्येही यश मिळू शकते. तसेच या काळात जोडीदाराशी चांगले संबंध राहू शकतात. या राशीतील लोकांना मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)