Rahu Transit: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ठराविक वेळेनंतर ग्रहांचे राशी परिवर्तन होते. या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीवर पाहायला मिळतो. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी राहू ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला होता. राहू केवळ दीड वर्षातून एकदा आपली चाल बदलतो. सध्या राहू मीन राशीत विराजमान असून, तो मे २०२५ पर्यंत याच राशीमध्ये राहणार आहे. त्यानंतर राहू शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवग्रहांत राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. जो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा कायापालट करू शकतो. त्यामुळे सध्या मीन राशीत असलेला राहू पुढील ३७६ दिवस इतर राशींच्या काही व्यक्तींना शुभ फळ देईल.

मेष

मीन राशीत विराजमान असलेला राहू ग्रह मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात अनेकदा मेष राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. केवळ आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

सिंह

मीन राशीतील राहू सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही पुढचे ३७६ दिवस शुभ फळ देणारा असेल. या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

हेही वाचा: पैसाच पैसा! अक्षय्य तृतीयेला बनणार ‘बुधादित्य अन् लक्ष्मीनारायण राजयोग’; ‘या’ राशींच्या लोकांचे दारिद्र्य संपणार

वृश्चिक

मीन राशीत विराजमान असलेला राहू ग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारी ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील.